मेहकर (बुलडाणा): लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथे सांडपाण्याच्या कारणावरून दोन गटात कुर्हाडीने हाणामारी झाल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी रात्रीदरम्यान घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून मेहकर पोलीस स्टेशनला २५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर त्यातील १६ जणांविरुद्ध अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, अंजनी खुर्द येथील लक्ष्मीबाई परमेश्वर अवसरमोल हिच्यासोबत गावातीलच नवृत्ती भीमराव अवसरमोल याचा घराच्या सांडपाण्याच्या कारणावरून वाद झाला. यामध्ये नवृत्ती भीमराव अवसरमोल यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून लक्ष्मीबाई अवसरमोल, तिचा पती परमेश्वर अवसरमोल तसेच नातू व दीर यांना काठी व कुर्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच लक्ष्मीबाई अवसरमोल हिला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद लक्ष्मीबाई अवसरमोल हिने मेहकर पोलीस स्टेशनला दिली.त्यावरून पोलिसांनी नवृत्ती भीमराव अवसरमोल, रवी भीमराव अवसरमोल, संगीता नवृत्ती अवसरमोल, दिनकर विठ्ठल अवसरमोल, भगवान होळकर, मंदाबाई चौधरी, अमोल भगवान गायकवाड, बन्सी गायकवाड, दत्ता भोकरे, अंकुश भाऊराव अवसरमोल, गंगुबाई भीमराव अवसरमोल, संतोष भीमराव अवसरमोल, मंगला संतोष अवसरमोल, रमा रवी अवसरमोल, त्र्यंबक भागाजी अवसरमोल, सिद्धार्थ अवसरमोल सर्व रा. अंजनी खुर्द यांच्याविरुद्ध अप.क्र. २१0/१४ कलम ३0७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ५0४ भादंविनुसार सह कलम ३ (१), (१0), ३ (२) (५) अजा कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. तर आमच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार का दिली म्हणून गौतम परमेश्वर अवसरमोल यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून संगीता बबन ऊर्फ नवृत्ती अवसरमोल हिच्यासह कुटुंबातील इतरांना काठी व कुर्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची फिर्याद संगीता अवसरमोल हिने मेहकर पोलिस स्टेशनला दिली आहे.
दोन गटात कु-हाडीने हाणामारी
By admin | Updated: November 29, 2014 22:54 IST