लोणार (जि. बुलडाणा) : विहीरीचे खोदकाम करताना वायर तुटल्याने झालेल्या घटनेत एक मजूर ठार तर दोन महिला जखमी झाल्याची घटना तालुक्यातील खुरमुर येथे १0 मे रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडली. पांडुरंग चंद्रभान भाग्यवंत (वय ६0) असे मृतकाचे नाव असून शांताबाई रोहीदास भाग्यवंत (वय ४५) व राधाबाई आत्माराम भाग्यवंत अशी गंभीर जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास सुरु आहे.
क्रेन अंगावर पडल्याने मजूर ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2016 02:46 IST