शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

बुलडाण्याच्या जलसमृद्धी पॅटर्नकडे देशाचे लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 15:06 IST

बुलडाण्याच्या जलसमृद्धीची स्वत: गडकरी यांनी दखल घेतल्याने जिल्ह्यातील अधिकारी वर्गही आता जागरूक झाला आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जलसंधारणाच्या कामातून निघणाऱ्या लाखो घनमीटर गौण खनीजाचा वापर महामार्ग बांधकामासाठी करून एक नवा पॅटर्न बुलडाण्यात जन्माला आला. जलसमृद्धीचा हा बुलडाणा पॅटर्न देशात लागू करण्याचे संकेत केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि एसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे दिली. बुलडाण्याच्या जलसमृद्धीची स्वत: गडकरी यांनी दखल घेतल्याने जिल्ह्यातील अधिकारी वर्गही आता जागरूक झाला आहे.देशभरामध्ये महामार्गाची कामे सध्या सुरू आहेत. राज्यातही समृद्धी महामार्ग व राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा असलेले काम सुरू आहेत. महामार्गाच्या कामासाठी महत्त्वाची अडचण येते ती म्हणजे, गौण खनिज आणि पाण्याची. परंतू जलसंधारणाच्या कामातून महामार्गाच्या कामासाठी पाणी आणि गौण खनिज उलब्ध केल्याचा उत्कृष्ट प्रयोग बुलडाण्यामध्ये काही महिन्यापूर्वी समोर आला होता. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा असलेला अजिंठा-खामगाव हा मार्ग बुलडाणा तालुक्यातून गेलेला आहे. या रस्त्याच्या कामासाठी लागणारे गौण खनीज हे रस्त्याला समांतर गेलेल्या सुमारे २६ किमी लांबीच्या पैनगंगा नदीपात्रातून घेऊन नदी खोलीकरण करून निघणारे गौण खनीज हे रस्ता कामासाठी वापरण्याचा नवा प्रयोग याठिकाणी झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची या प्रकल्पासाठी माजी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी अनुमती मिळवून हा प्रकल्प मार्गी लावला होता. रस्ता बांधकाम करण्यासाठी आवश्यक असलेले गौणखनीज जलस्त्रोत निर्माण होऊ शकणाºया ठिकाणाहून उपसा करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आदेशित करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता मिळवली होती. त्या अंतर्गत अजिंठा-बुलडाणा या महामार्गासाठी लागणाºया गौणखनीजाची उपलब्धता जलस्त्रोत निर्मितीतून झाली.बुलडाणा तालुक्यातील मढ येथे ५, चौथा १, पाडळी १ अशा सात गाव तलावांच्या निर्मितीमधून महामार्गासाठी गौण खनिज उपलब्ध झाले. यामध्ये शासनाचा कुठलाच खर्च झाला नाही. त्यामुळे जलसंवर्धनासोबतच महामार्गासाठी गौण खनीजाच्या उपलब्धीचा हा प्रकल्प देशासाठी लक्षवेधी ठरत आहे. देशासाठी महत्त्वाचा प्रकल्पबुलडाण्यातील जलसमृद्धीचा पॅटर्न देशासाठी किती महत्त्वाचा आहे, या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी नागपूर येथील बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे बुलडाण्याच्या या पॅटर्नचे खºया अर्थाने महत्त्व देशासमोर येत आहे.

पैनगंगेचे पुनरूज्जीवन अजिंठा पर्वत रांगेच्या कुशीत वसलेल्या पैनगंगा नदीपात्राच्या परिसरातील गावांना दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. परंतू पैनगंगा उगमस्थानापासून ते येळगाव धरण क्षेत्रापर्यंत १०४ सिमेंट नाला बांध काम करण्यात आले. सोबतच नदी खोलीकरणाच्या माध्यमातू पैनंगेचे पुनरूज्जीवन हा प्रोजेक्ट राबवून पाणी पातळीत वाढ आणि महामार्गाला गौण खनिज असा दुहेरी फायदा झाला.