शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

देशात आणि राज्यात ‘विकृत’ सत्तेत : प्रा. ज्ञानेश वाकुडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 01:25 IST

खामगाव: केंद्रासह राज्यात सत्तेत असलेल्यांनी जनतेची ओरबडणूक चालविली असून, संघटीत धोकेबाजी करीत शेतकर्‍यांच्या, कष्टकर्‍यांच्या भावनांशी खेळणारे सत्ताधारी टपोरी आणि विकृत असल्याचा सणसणाटी आरोप लोकजागर इंडियाचे प्रणेते   प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी येथे केला.

ठळक मुद्देलोकजागर इंडिया विधानसभेच्या २८८ जागा लढविणार!

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: केंद्रासह राज्यात सत्तेत असलेल्यांनी जनतेची ओरबडणूक चालविली असून, संघटीत धोकेबाजी करीत शेतकर्‍यांच्या, कष्टकर्‍यांच्या भावनांशी खेळणारे सत्ताधारी टपोरी आणि विकृत असल्याचा सणसणाटी आरोप लोकजागर इंडियाचे प्रणेते  प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी येथे केला.खामगाव येथील पत्रकार भवनात आयोजित पत्र परिषदेत गुरुवारी ११ जानेवारी रोजी  प्रा. वाकुडकर यांनी लोकजागर इंडियाची भूमिका स्पष्ट केली. केंद्र आणि राज्य शासनावर सडकून टीका करताना ते म्हणाले की, देशात आणि राज्यात पूर्वी काँग्रेसच्या -राष्ट्रवादीच्या माध्यमातून  भ्रष्ट आणि बेफिकीरांचे राज्य होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाचाला कंटाळलेल्या जनतेने पर्याय म्हणून मोदी-फडणवीस म्हणजेच भाजपला निवडूण दिले. मात्र, भाजपने शेतकरी, कष्टकरी आणि जनतेचा भ्रमनिराश केला आहे. मोदी सत्तेत आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपला छुपा अतिरेकी अंजेडा उघडपणे राबविला आहे. परिणामी, मोदींमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे फार मोठे नुकसानही झाले आहे. शेतकरी, कष्टकर्‍यांसोबतच ओबीसी विद्यार्थीही शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे अडचणीत आले असल्याचेही वाकुडकर म्हणाले.  यावेळी सध्या सत्ताधरी पक्षाच्या काही चुकीच्या धोरणांचाही त्यांनी उहापोह केला.यावेळी लोकजागर इंडियाचे महासचिव महादेव मिरगे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.  

झिरो बजेट लोकशाहीची संकल्पना साकारणार!काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-सेनेला नवा पर्याय म्हणून लोकजागर इंडियाच्या माध्यमातून तिसरा पर्याय उभा करण्याचे आपले प्रयत्न आहेत. यामध्ये विद्याथी, युवक, महिला आणि बुद्धीजीवींना उमेदवारी देत, आगामी विधानसभेच्या सर्वच २८८ जागांवर लोकजागर इंडियाचे उमेदवार उभे केले जातील. राज्यात लोकजागर इंडियाच्या माध्यमातून टप्प्या-टप्प्याने  सात कलमी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये झीरो बजेट लोकशाही आणि गाव तिथे उद्योग ही दोन कलमं त्यांनी गुरुवारी जाहीर केली. तर उर्वरीत पाच कलमे एप्रिलपर्यंत जाहीर करणार असल्याचे प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :khamgaonखामगाव