शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : तपासणी केलेल्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह; शेगावातील हॉस्पिटल सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 18:00 IST

हॉस्पीटल रविवारी सील करण्यात आले असून, या रुग्णालयातील डॉक्टरसह सहा जणांना क्वारंटीन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगांव : खामगावातील जिया कॉलनीतील कोरोना पॉझिटिव्ह महिलेची शेगावातील एका रुग्णालयात प्रारंभी तपासणी करण्यात आल्याने हे हॉस्पीटल रविवारी सील करण्यात आले असून, या रुग्णालयातील डॉक्टरसह सहा जणांना क्वारंटीन करण्यात आले आहे. त्यामुळे शेगावकरांना पुन्हा एकदा दुहेरी झटका बसला आहे. खामगाव शहरातील जिया कॉलनीमधील एक महिला १६ मे रोजी पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. ही महिला तिच्या नातेवाईकासह ११ मे रोजी खामगाव शहरात राहण्यासाठी आली होती. दरम्यान, १३ मे रोजी या महिलेची प्रकृती खराब झाल्याने तिला शेगाव येथील एका हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आजारी असलेल्या महिलेमध्ये आढळून आलेली लक्षणे पाहता त्यांची कोवीड-१९ ची चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. शेगावातील नवीन बाजार समितीच्या पाठीमागील बाजूस हे हॉस्पीटल असून त्याच्या लगत एक जिनींगही आहे. दरम्यान, या महिलेस १४ मे रोजी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता तेथील आयसोलेशन कक्षात त्यांना दाखल करून घेण्यात येऊन त्यांचा स्वॅब नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.१६ मे रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खामगाव शहरात खळबळ उडाली होती. त्यामुळे जिया कॉलनीसह लगतचा सर्वच परिसर सील करण्यात आला. पॉझिटिव्ह आलेल्या महिलेच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्यात येत असताना शेगावातील एका खासगी रुग्णालयाचा संदर्भ आला. त्यानुषंगाने शेगाव येथील पालिका मुख्याधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आल्यानंतर शेगाव येथील संबंधित हॉस्पीटल सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने शेगावात पुन्हा खळबळ उडाली होती. दरम्यान, आता पुढील आदेशापर्यंत हे हॉस्पीटल बंद ठेवण्यात येणार आहे. सोबतच कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरसह रुग्णालयातील सहा जणांना सईबाई मोटे रुग्णालयात क्वारंटीन करण्यात येऊन त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी अकोला पाठविण्यात आले असल्याचे सुत्रांनी सांगितले. अकोला येथील प्रयोग शाळेकडून १८ मे रोजी त्यांचे अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे.  शेगावातील ‘त्या’ सफाई कामगाराच्या संपर्कातील २३ जण क्वारंटीनशेगाव पालिकेत सफाई कामगार पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील २३ जणांना क्वारंटीन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने बाधीत व्यक्तीचे नातेवाईक व त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा समावेश आहे. यात प्रामुख्याने रामदेव बाबा नगरमधील व्यक्तींचा समावेश आहे. पालिकेत सफाई कामगार असलेला हा ३५ वर्षीय व्यक्ती १६ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. क्वारंटीन करण्यात आलेल्यांपैकी हायरिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीस पाठविण्यात येणार आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याShegaonशेगावhospitalहॉस्पिटल