शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण दीडपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 12:44 IST

१ ते ८ आॅक्टोबरपर्यंतच्या कालावधित ३३७ जणांना कोरोना संसर्ग झाला, तर ५१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख झपाट्याने खालावत आहे. आजवर जिल्ह्यात एकूण ४८६८ जणांना कोरोना संसर्ग झाला असला तरी, सप्टेंबरच्या अखेरपासून मात्र संसर्गाच्या प्रमाणात सतत घट होत असून, बरे होणाºयाच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात १ ते ८ आॅक्टोबरपर्यंत ३३७ जणांना कोरोना संसर्ग झाला, तर ५१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण हा मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे ३ एप्रिल रोजी आढळून आला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यातच कुकसा फाटा ता. मालेगाव येथे दोन आणि मुंबईवरून मालेगावला परत येत असताना सहा जणांना कोरोना संसर्ग झाला. मे व जून महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. तथापि, जुलै महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली. आॅगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या आकड्याचा स्फोट झाला. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार गेल्या आठवडाभराचा विचार करता १ आॅक्टोबर ते ८ आॅक्टोबरपर्यंतच्या कालावधित जिल्ह्यात केवळ ३३७ लोकांना कोरोना संसर्ग असल्याचे निष्पन्न झाले. दुसरीकडे याच कालावधित ५१४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिश्चार्ज देण्यात आला. बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण दीडपटीपेक्षा अधिक असल्याचे सिद्ध होत आहे. ही बाब जिल्हावासियांसाठी मोठा दिलासा देणारी ठरली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम