शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बुलढाण्यात आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 14:22 IST

बुलढाणा जिल्ह्यातील पॉझिटिव रुग्णांची संख्या आता 24 झाली आहे.

ठळक मुद्देतिघांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांनी यास दुजोरा दिला आहे.

बुलढाणा: नागपूर जिल्ह्यातील कामठी येथून बुलढाण्यात धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या 11 जणांपैकी तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बुलढाणा येथे 20 मार्च पासून धार्मिक कार्यासाठी या सर्व व्यक्ती आल्या होत्या. दरम्यान , या अकरा जणांचे 25 एप्रिल रोजी  अकोला येथील प्रयोगशाळेत स्वाब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी तिघांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांनी यास दुजोरा दिला आहे.परिणामी बुलढाणा जिल्ह्यातील पॉझिटिव रुग्णांची संख्या आता 24 झाली आहे. दरम्यान यापैकी पंधरा जणांना आतापर्यंत बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे,  तर आठ जणांवर सध्या covid-19 रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता शेगाव खामगाव देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा हे तालुके कोरोना मुक्त झालेले आहेत. सिंदखेड राजा येथील एकास सोमवारी दुपारी covid-19 रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. त्याच दरम्यान बुलढाणा शहरात कामठी येथील 11 जणांपैकी तीनजण कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याचे वृत्त धडकले. बुलढाणा जिल्ह्यात तब्बल तेरा दिवसानंतर कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. यापूर्वी 13 एप्रिल रोजी मलकापूर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या