शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात ६० हजार नागरिकांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 12:39 IST

जिल्ह्यात सध्या ५९ प्रतिबंधीत क्षेत्र असून त्यामधील ६० हजार ४९० नागरिकांचे नियमितपणे आरोग्य सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत असून खामगाव नांदुऱ्यामध्ये प्रत्येकी चार कोरोना बाधीत आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता जिल्ह्यात सध्या ५९ प्रतिबंधीत क्षेत्र असून त्यामधील ६० हजार ४९० नागरिकांचे नियमितपणे आरोग्य सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.एकंदरीत वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील दोन टक्के नागरिक हे कोरोना संसर्गीत व्यक्ती सापडलेल्या भागात राहत असून त्यांचे आरोग्य विभागाच्या २५६ पथकांद्वारे नियमति सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. खामगाव शहरात चार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने प्रतिबंधीत क्षेत्राची संख्या आता आणखी वाढणार आहे. जिल्ह्यात २८ मार्च पासून आजपर्यंत १८३ कोरोना बाधीत आढळून आले असून ते राहत असलले क्षेत्र हे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यांची एकूण संख्या ७४ वर जाते. दरम्यान, यापैकी १५ प्रतिबंधीत क्षेत्र शिथील करण्यात आले आहे. या १५ क्षेत्रात २८ दिवसात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून न आल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले होते.मात्र त्याउपरही सध्या ५९ प्रतिबंधीत क्षेत्र सध्या जिल्ह्यात असून १३ पॉझिटिव्ह रुग्ण पुन्हा जिल्ह्यात आढळून आल्याने यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रतिबंधीत क्षेत्रात असलेल्या ११ हजार ९०५ घरांमध्ये ६० हजार ४९० नागरिक राहत असून त्यांच्या आरोग्याची बारकाईने सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. त्यासाठी २५६ पथकांमध्ये खासकरून ७३ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.दुसरीकडे नांदुरा, खामगाव, शेगावातील आळसणा, शेगावातील शादीखाना, बावनबीर या सहा ठिकाणी बाधीत व्यक्तीच्या घरालगतचा भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून बाधीतांच्या संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले असून त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.

६४१ व्यक्तींना दुर्धर आजारप्रतिबंधीत क्षेत्रातील सर्व्हेक्षणा दरम्यान ६४१ व्यक्तींना दुर्धर आजार असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्यावरही ७३ डॉक्टर नजर ठेवून आहेत. प्रसंगी मलकापूर शहरातील दुर्धर आजार असलेल्यांचा स्वॅबही घेतला जाण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या