शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : जळगाव जामोद येथील २२ जणांचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 14:16 IST

जळगाव जामोद येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

जळगाव जामोद: नगरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संपकार्तील सर्व २२  जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने जळगाव नगरासह तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.                                                                  

गुरुवारी रात्री बाधित रुग्णाच्या कुटुंबातील दोघे जण व फळांच्या व्यवसायात मदत करणारे दोन व्यक्ती अशा चार जणांचे  रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. त्यांना कोविंड रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते  जळगावला आपापल्या घरी पोहोचले आहे. यापूर्वी बाधित रुग्णाचे काका यांचा रिपोर्ट सुद्धा निगेटिव्ह होता. त्यामुळे आता बाधित रुग्ण सोडून त्यांच्या कुटुंबातील दहा जण, मित्र परिवारातील नऊ जण व व्यवसायात सहकार्य करणारे दोन ड्रायव्हर व दोन कामगार  अशा सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने जळगावकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.  शहरातील कंटेनमेंट झोन मात्र कायमच राहणार आहे. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने या झोनमधील ४४६  कुटुंबांची तपासणी सुद्धा नियमाप्रमाणे केली  जात आहे व नगरपरिषदेच्या वतीने या झोनची सॅनीटायझेशनची प्रक्रियासुद्धा नियमितपणे सुरू आहे. परप्रांतातून आलेल्या व्यक्तीनी आपली नोंद  करीत तपासणी करून घ्यावी असे आवाहन उपविभागीय महसूल अधिकारी वैशाली देवकर यांनी केली आहे. कंटेनमेंट झोनमधील बँकांना आपले कामकाज सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.                                                                                                        कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले  सर्व २२  जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असले तरी या सर्वांना होम कॉंरंटीन करण्यात आले असून कुटुंबात सुद्धा त्यांनी  विलगीकरनाच्या नियमाचे पालन करावे, अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.                                                                                                                  कोरोनाबाधित असलेल्या व्यक्तीच्या मित्राला ताप, खोकला, सर्दी आदी त्रास नसल्याचे कोविड  रुग्णालयातून घरी परतलेल्या व्यक्तींनी लोकमतशी बोलतांना सांगितले. 

( तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदcorona virusकोरोना वायरस बातम्या