शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : तिसऱ्या लाटेची शक्यता; ग्रामीण रूग्णालयांचीही होणार सज्जता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 11:12 IST

CoronaVirus in Buldhana : ग्रामीण रुग्णालयांची सुसज्जता वाढविण्यावर आरोग्य विभाग भर देत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : दुसऱ्या लाटेदरम्यान बुलडाणा येथील कोविड समर्पित रुग्णालय आणि खामगाव येथील रुग्णालयावर वाढलेला ताण कमी करण्याच्या दृष्टीने ग्रामीण रुग्णालयांची सुसज्जता वाढविण्यावर आरोग्य विभाग भर देत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढल्यास ग्रामीण रुग्णालयांमध्ये आनुषंगिक सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे.यात प्रामुख्याने प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये किमान ३० बेडवर ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करण्यावर भर राहणार आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान ग्रामीण भागात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव होऊन जवळपास ४९ टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण निघत होते. त्यातल्या त्यात शहरी भागामध्ये कोरोनावर उपचारासाठीच्या सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे बुलडाणा क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील एक मोठा जिल्हा असल्यामुळे कोरोना बाधित रुग्णांना थेट शहरी भागात उपचारासाठी यावे लागत होते. त्यातून शहरी भागातही कोरोनाचे संक्रमण अधिक होण्याची भीतीही व्यक्त होत होती. मृत्यू पावलेल्यांपैकी बहुतांश जणांवर शहरी भागातील स्मशानभूमीमध्येच अंत्यसंस्कार करावे लागले होते.परिणामस्वरूप ग्रामीण भागाच्या जवळच तालुकास्तरावर आरोग्य सुविधा उपलब्ध करून तेथेच ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांवर उपचार होतील या दृष्टीने आता आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. परिणामस्वरूप ग्रामीण रुग्णालयांमध्येही आता कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी सुविधा निर्माण करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.

सीएसआर फंडातून २०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळणारजिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजनची पूर्तता करण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची संख्या वाढविण्यात येणार असून सीएसआर फंडातून अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पुढाकाराने २०० ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर उपलब्ध होणार आहे. सोबतच पूर्वीचे २६० आणि नव्याने मिळणारे २०० असे मिळून ४५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आरोग्य विभागास तिसऱ्या लाटेत उपयोगात आणता येणार आहे. यातील ३० कॉन्सन्ट्रेटर हे १० एलपीएमचे असून त्यातून एकावेळी दोन रुग्णांना ऑक्सिजन देता येईल.

आपत्कालीन स्थितीसाठीही बॅकअपजिल्ह्यातील ऑक्सिजनची मागणी प्रसंगी २५ मेट्रिक टनापर्यंत गेल्यास १८५२ जम्बो सिलिंडरच्या माध्यमातून ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्याचे प्रशासनाने नियोजन केले आहे. यासोबतच आरोग्य विभाग आणखी २५० जम्बो सिलिंडरही विकत घेणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. हे सिलिंडर रिफिलिंग करण्यासाठी बुलडाणा आणि खामगाव येथे प्लांट कार्यान्वित करण्यात येत आहे. त्यासंदर्भातील हालचालीही प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या