शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : एसी बसमध्ये ‘पेस्ट कंट्रोल’; शिवशाहीमध्ये सॅनिटायझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 12:06 IST

शिवशाही बसेसमध्ये सॉनिटायझर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर एसटी महमंडाळाकडून सतर्कता बाळगली जात आहे. त्यासाठी बसस्थानकावर कर्मचाऱ्यांसाठी लिक्वीड, साबनाची व्यवस्था करण्यात आली आहे. एसी बसमध्ये ‘पेस्ट कंट्रोल’ करण्यात येणार असून, सर्व शिवशाही बसेसमध्ये सॉनिटायझर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.कोरानाची धास्ती सर्वांनाच निर्माण झाली आहे. त्यामुळे गर्दी होणारे बहुतांश ठिकाण बंद करण्यात आले आहेत. परंतू बसस्थानक अत्यंत गर्दीचे ठिकाण असल्याने येथे विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सर्वत्र कोरोना विषाणूची दहशत निर्माण झाल्याने शहराच्याठिकाणी बाहेरगावी असलेले काही कुटुंब गावाकडे परत येत आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद याठिकाणी राहणे अनेक विद्यार्थी सुद्धा गावाकडे परतत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या प्रतिबंधक उपाययोजना म्हणून राज्य परिवहन महामंडळाने विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यात एकूण सात आगार असून या आगारांतर्गत येणारे सर्व बसस्थानक निर्जंतूक करण्यात येत आहेत. किटक व जंतू नष्ट करण्यासाठी ‘पेस्ट कंट्रोल’ करण्यात येते. त्यामुळे आजारावर नियंत्रण मिळविल्या जाऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर एसी बसेसमध्ये पेस्ट कंट्रोल करण्यात येणार आहे. बसमधील सर्व आसन पेस्ट कंट्रोल करण्यात येणार आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी हात धुणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांसाठी लिक्वीड व साबणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी शिवशाही बसेसमध्ये सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सुमारे १७ शिवशाही बसेसमध्ये सॅनिटायझर ठेवण्यात येणार आहे.

तीन लाखांवर खर्चकोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व बसस्थानकांवर आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी सुमारे तीन लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च आतापर्यंत करण्यात आला आहे. त्यामध्ये बसस्थानक जंतूनाशक औषधाने धुण्यापासून ते एसटी चालक वाहक कर्मचाºयांना मास्क देणे, बसमध्ये सॅनिटायझर ठेवणे आदी उपाययोजनांसाठी हा खर्च करण्यात आला आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बसस्थानकावर विशेष काळजी घेण्यात येत आहे. सर्व बसस्थानक निर्जंतूक करण्यात आले आहेत. पेस्ट कंट्रोल व शिशाहीमध्ये सॅनिटायझर उपलब्ध करण्यात येणार आहे.-संदिप रायलवार,विभाग नियंत्रक, बुलडाणा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbuldhanaबुलडाणा