शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : खामगावात कोरोनाबधित महिलेचा मृत्यू, सुल्तानपुरात एक पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 21:40 IST

Coronavirus : खामगावात कोरोनाबधित महिलेचा मृत्यू, सुल्तानपुरात एक पॉझिटिव्ह आढळून आला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव/ जळगाव जामोद : बुुलडाना  जिल्ह्यात दोन दिवसानंतर सोमवारी दुपारी आलेले तब्बल ५७ अहवाल निगेटिव्ह आल्याची दिलासादायक स्थिती असताना सायंकाळी जळगावातील सुलतानपुºयातील  कोरोना संदिग्ध मृत व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान ठाण्याहून आलेल्या खामगावातील  ६० वर्षीय पॉझिटिव्ह वृद्ध महिलेचा सोमवारी संध्याकाळी मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हयातील कोरोनाबाधितांची संख्या ३० झाली असून तिघांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचे स्पष्ट होते. दोन दिवसापूर्वी खामगाव, शेगाव व नरवेल येथे  तिघेजण पॉझिटिव्ह आले होते. चार दिवसापूर्वी मलकापूर पांग्रा येथे एका मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर जळगाव येथे १० मे रोजी एक रुग्ण पॉझिटिव्ह निघाला होता. शुक्रवारी १६ मे रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास जळगाव येथील ७२ वर्षीय कोरोना संदिग्ध व्यक्तीचा खामगाव येथे कोविड रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर शुक्रवारी दुपारी त्याच्यावर वैद्यकीय प्रोटोकॉल नुसार अंत्यसंस्कार करण्यात आले होते. सदर मृत व्यक्ती गुरुवारी पुण्यावरून जळगाव जामोद मध्ये आला होता. दरम्यान त्याला तीव्र स्वरूपाच्या तापा सह श्वास घेण्यास त्रास होत होता. या व्यतिरिक्त त्यास मधुमेह, हृदयरोग व तत्सम आजार होते. या पृष्ठभूमीवर सुलतानपुरा परिसर सील करण्यात आला. सुलतानपुºयासह सभोवतालचा परिसर कंटेनमेन्ट झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून या झोनमध्ये नगर परिषदेच्यावतीने सॅनीटायझेशनची  फवारणी करण्यात आली.   आ. डॉ. संजय कुटे, नगराध्यक्षा सीमाताई डोबे यांच्यासह उपविभागीय महसूल अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, मुख्याधिकारी डॉ. आशिष बोबडे, ठाणेदार सुनील जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्वलाताई पाटील व डॉ. सावंत राठोड यांनी कंटेनमेन्ट झोनमध्ये पोहोचून नागरिकांना धीर दिला.

ठाण्याहून खामगावात आलेल्या ‘त्या’ वृद्धेचा अखेर मृत्यूखामगाव शहरातील समन्वय नगर भाग २ मध्ये नातेवाईकांकडे ठाण्याहून आलेल्या ६० वर्षीय वृद्धेचा सोमवारी अखेर मृत्यू झाला. शनिवारी ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर तिला कोविड रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले होते. अखेर या महिलेचा सोमवारी संध्याकाळी मृत्यू झाला. ती अन्य आजारांनी ग्रस्त असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. तिच्यावर बर्डे प्लॉटमधील दफनभूमीमध्ये दफनविधी पार पाडण्यात आला. प्रशासनातर्फे या भागात आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढले असून नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkhamgaonखामगाव