CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यातील गंभीर रुग्णांचे प्रमाण ९० टक्क्यांनी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 12:50 PM2020-12-12T12:50:10+5:302020-12-12T12:52:31+5:30

गंभीर रुग्णांचा आकडा आता झपाट्याने खाली आला आहे.

CoronaVirus: The number of critically ill patients in Buldana district has dropped by 90 per cent | CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यातील गंभीर रुग्णांचे प्रमाण ९० टक्क्यांनी घटले

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यातील गंभीर रुग्णांचे प्रमाण ९० टक्क्यांनी घटले

Next
ठळक मुद्देगंभीर रुग्णांचा आकडा कधीतरी ३०वर पोहोचला होता.एका रुग्णास १०५ किलोपर्यंत ऑक्सिजन लागत असल्याचे चित्र होते.आता केवळ ०.४० केएल ऑक्सिजन लागत असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात वाढलेला गंभीर रुग्णांचा आकडा आता झपाट्याने खाली आला आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा वापरही घटला असून, गंभीर रुग्णांना आता फक्त खामगावच्या आयसोलेशन वॉर्डातच दाखल केले जात असल्याने इतर ठिकाणचा ऑक्सिजन वापर जवळपास बंदच झाल्यात जमा आहे.
कोरोनाचा कहर सुरू असताना ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात गंभीर रुग्णांचा आकडा कधीतरी ३०वर पोहोचला होता. वारंवार वाढत चाललेली ही संख्या आरोग्य विभागाची डोकेदुखी बनली होती. यामुळे ऑक्सिजनचा वापरही वाढला होता. शिवाय सहा ते सात रुग्णांना तर बायपॅप मशीनवर ठेवण्याची वेळ आली होती. एका रुग्णास १०५ किलोपर्यंत ऑक्सिजन लागत असल्याचे चित्र होते. मात्र आता ही संख्या झपाट्याने घटली आहे. ३० रुग्ण असताना २४ तासांत ९० ते १०० जम्बो सिलिंडर लागत असल्याचे चित्र होते. 
गंभीर रुग्णांची संख्या घटल्याने केवळ ०.४० केएल ऑक्सिजन लागत असल्याचे चित्र आहे. पूर्वीपेक्षा ८० टक्के वापर कमी झाला.

Web Title: CoronaVirus: The number of critically ill patients in Buldana district has dropped by 90 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.