शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : नऊ कोवीड केअर सेंटर वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 11:43 IST

बुलडाणा, चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, मलकापूर येथे प्रत्येकी एक कोवीड केअर सेंटर वाढविण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोवीड केअर सेंटरमध्येही संदिग्धांना जागा उपलब्ध करण्याच्या दृष्टीकोणातून प्रशासकीय पातळीवर नियोजन करण्यात येत आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्यात १८ कोवीड केअर सेंटर कार्यरत असून त्यांची क्षमता ही ३,२२५ खाटांची आहे. नऊ कोवीड सेंटर कार्यान्वीत झाल्यास जवळपास दीड हजार खाटा अधिकच्या उपलब्ध होणार आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात शहरी तथा ग्रामीण भागातील मोठ्या गावात कोवीड केअर सेंटरसाठी जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी त्यानुषंगाने पाहणी करण्यात आली असून नव्याने उभारावयाच्या नऊ कोवीड केअर सेंटर पैकी पाच कोवीड केअर सेंटरसाठी जागा अधिग्रहीत करण्यात आली आहे. मात्र अद्याप या ठिकाणी प्रत्यक्षात हे सेंटर कार्यान्वीत झालेले नाही. संदिग्धांची वाढती संख्या विचारात घेता गरजेनुरूप प्रत्यक्षात ही केंद्र कार्यान्वीत करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले तर उर्वरित चार जागांच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सद्या सुरू आहे.बुलडणा जिल्ह्यात वर्तमान स्थितीत १३ ही तालुक्यात १८ कोवीड केअर सेंटर कार्यान्वीत असून त्यामध्ये संदिग्ध रुग्णांसह ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची नगण्य लक्षणे किंवा सौम्य लक्षणे आहेत, अशा रुग्णांना ठेवण्यात येत आहे. वर्तमान स्थिती जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा साडेसहा हजारांच्या टप्प्यात आला आहे. अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्याही एक हजाराच्या पुढे आहे. त्यामुळे येत्या काळात कोवीड केअर सेंटरची क्षमताही वाढवावी लागणार आहे. त्यानुषंगाने प्रशासनाने हे नियोजन सुरू केले आहे.यामध्ये बुलडाणा, चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, मलकापूर येथे प्रत्येकी एक कोवीड केअर सेंटर वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोवीड केअर सेंटरची संख्या २७ होणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या