शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : मलकापूर बनले हॉटस्पॉट; आणखी दोन जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 10:46 IST

मलकापूर शहर व तालुक्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असून शहराचा आकडा आता १५ वर गेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर/साखरखेर्डा: बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण सातत्याने वाढत असून आता जिल्ह्यात कोरोनाचे ७७ रुग्ण झाले असून पैकी २७ रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत आहे. प्रामुख्याने मलकापूर शहर व तालुक्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असून शहराचा आकडा आता १५ वर गेला आहे.दरम्यान, सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथेही पाच रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर बुलडाणा येथील आयसोलेशन कक्षात उपचार करण्यात येत आहे. सिंदखेड राजा शहरातील महिलाही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने सिंदखेड राजा तालुक्यात सध्या सहा अ‍ॅक्टीव्ह कोरोना पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे जिल्ह्याचे सध्या साखरखेर्डा आणि मलकापूर तालुक्यावर लक्ष लागून असून मलकापूर तालुक्यातील कोरानाबाधीतांची संख्या आता जवळपास १९ झाली आहे.मलकापूर येथील मुक्ताईनगर मार्गावरील एक जण आणि धरणगाव येथील ७० वर्षीय महिला कोरोना बाधीत आढलून आल्या आहेत. त्यांच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींचीही तपासणी करण्यात येत असून प्रशासनाने मलकापूर तालुक्यावर सध्या अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. मुक्ताईनगरमधील रहिवाशी हा त्याच्या वाहनांद्वारे अकोला येथे मालवाहतूक करत होता तर कोरोनाग्रस्त ७० वर्षीय महिलेचा मुलगा हा कोरानाग्रस्त डॉक्टरकडे कामाला होता, ्शी माहिती समोर येत आहे.दुसरीकड े सिंदखेड राजा शहरात यापूर्वी एक व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आला होता. दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रम आटोपून तो परत आला होता. तो उपचार घेतल्यानंतर कोरोनामुक्त झाला होता. त्यामुळे सिंदखेड राजातील नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र आता काझी गल्लीतील महिला पॉझिटिव्ह आढळून आल्याने येथील नागरिकांची धाकधूक वाढली असून या बाधीत महिलेला ह्रदयरोग, मधुमेहही ्सल्याची माहिती आहे. सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सुभाष दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. डी. यू. मेहेत्रे, डॉ. खान यांनी सतरा जणांना होमक्वारंटीन राहण्याचा सल्ला दिला असून ठाणेदार जयवंत सातव, पोलीस उपनिरीक्षक राम पारवे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रतिबंधीत क्षेत्र सील केले असून सिंदखेड राजा पालिकेकडून येथे विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांची नियमित आरोग्य पथकांद्वारे तपासणी करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. जिल्ह्यात आता प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये पुन्हा वाढ झाली असून जवळपास २७ प्रतिबंधीत क्षेत्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. सध्या परिस्थितीत प्रामुख्याने खामगाव, मलकापूर, सिंदखेड राजा, मोताळा या तालुक्यांमध्े कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे. त्यातल्या त्यात मलकापूर तालुक्यात कोरोनाचे संक्रमण सातत्यो वाढत असून त्याचे समुह संक्रमणात रुपांतर होणार नाही, याची काळजी गरजेची आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMalkapurमलकापूर