संग्रामपूर: दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रम आटोपून परतलेल्या संग्रामपूरच्या सहा तर नांदुरा येथील ५ लोकांना ‘होम क्वारंटीन’ करण्यात आले आहे.संग्रामपूर तालुक्यातील बोडखा, काकनवाडा, कवठळ येथील प्रत्येकी दोन दोन व्यक्तीचा समावेश आहे. या सहाही नागरिकांना शेगाव येथे ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. याशिवाय चांदूरबिस्वा येथील पाच व्यक्तींना ‘होम क्वारंटीन’ केले असल्याची माहिती तहसिलदार राहूल तायडे यांनी दिली. ‘होम क्वारंटीन’ असलेल्या व्यक्तींच्या हातावर आरोग्य विभागाच्या वतीने तसा शिक्का मारण्यात आला आहे. संबंधित व्यक्तींना १४ दिवस घरातच राहणे बंधनकारक आहे. हातावर शिक्का असताना बाहेर फिरताना आढळून आल्यास कारवाई होणार आहे. खामगाव येथे भरती असलेल्या व्यक्तींचा रिपोर्ट यायला आणखी अवधी लागणार आहे.
CoronaVirus : दिल्लीतून आलेल्या ११ नागरिकांना केले ‘होम क्वारंटीन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 12:02 IST