शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : प्रतिबंधीत क्षेत्रातील गर्भवती महिलांचीही कोरोना चाचणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 10:37 IST

प्रसुतीस पाच दिवस राहलेल्या गर्भवती महिलांची कोरोना चाचणी करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गीत रुग्ण आढळलेल्या प्रतिबंधीत क्षेत्राताली गर्भवती मातांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील ११ प्रतिबंधीत क्षेत्रातील गर्भवती मातांची माहिती आरोग्य विभागाने संकलीत केली असून प्रसुतीस पाच दिवस राहलेल्या गर्भवती महिलांची कोरोना चाचणी करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.यासंदर्भात केंद्र शासनाने राज्य शासनाला सुचना दिल्या होत्या. गेल्या आठ दिवसापूर्वी याबाबतचे आदेश राज्य शासनाकडून बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाले होते. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेने कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती आरोग्य विभागातील वरिष्ठ सुत्रांनी दिली.दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील सात तालुक्यात एकूण ११ प्रतिबंधीत क्षेत्र आहेत. यामध्ये बुलडाणा शहरात दोन, मलकापूरमध्ये दोन, देऊळगाव राजामध्ये दोन, मलकापूरमध्ये तीन, सिंदखेड राजात एक, शेगावात एक, खामगावमधील चितोडा अशा ११ कंटेन्मेंट झोनमद्ये ९२ हजार ५२६ लोकसंख्येमधून गर्भवती मातांचा शोध सर्व्हेक्षण पथकांनी घेतला असून त्यांच्या संभाव्य प्रसुती दिनांकाची नोंद घेतली आहे.

दरम्यान, संभाव्य प्रसुती दिनांकाच्या पाच दिवस अगोदर अशा महिलांची कोरोना चाचणी करणे राज्य शासनाच्या निर्देशानुसार अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सध्या अलर्टवर आहे. सोबतच या प्रतिबंधीत क्षेत्रातील दुर्धर आजार असलेल्या रुग्णांचीही नोंद घेण्यात आली असून सर्दी, ताप असलेल्यांचेही ३५७ वैद्यकीय पथकांद्वारे तपासणी होत आहे. दरम्यान, वर्तमान स्थितीत बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची लागन ही आटोक्यात आल्याचे चित्र आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या