शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana : दहा जणांचा अहवाल 'निगेटीव्ह'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 16:24 IST

दहा जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल आरोग्य प्रशासनास प्राप्त झाला असून तो निगेटीव्ह असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक प्रेमचंद पंडीत यांनी स्पष्ट केले.

बुलडाणा: कोरोना संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील ३० संदिग्ध रुग्णांच्या स्वॅब नमुन्यापैकी दहा जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल आरोग्य प्रशासनास प्राप्त झाला असून तो निगेटीव्ह असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक प्रेमचंद पंडीत यांनी स्पष्ट केले.दोन आणि तीन एप्रिल रोजी दिल्ली येथील एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या ३० जणांचे स्वॅब नमुन्यांचे अहवाल हे नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी दहा जणांचे स्वॅब नमुन्यांचे अहवाल हे  निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान उर्वरित  २० जणांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. ते आल्यानंतर एकंदर चित्र स्पष्ट होईल. बुलडाणा जिल्ह्यातून पाच मार्च पासून आजपर्यंत एकूण ८३ व्यक्तींचे स्वॅब नमुने हे नागपूर येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी आतापयंत ६३ जणांचे स्वॅब नमुने प्राप्त झाले आहेत. कालपर्यंत ही संख्या ५३ होती. दरम्यान, यापैकी पाच जणांचे रिपोर्ट हे  पॉझीटीव्ह  आले होते. त्यातील एकाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला होता तर अन्य चार जण हे  मृत व्यक्तीच्या निकट संपर्कातील होते. ते सध्या आयसोलेशन कक्षात आहेत. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृतीही स्थिर असल्याचे शनिवारी दुपारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी सांगितले. दरम्यान, आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबत संदिग्ध म्हणून गणल्या गेलेल्या ११२ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी शंका आलेल्या ८३ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले होते. त्यातील २० नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबीत आहे. सध्या बुलडाणा जिल्ह्यातील १२ नागरिक हे आयसोलेशन वॉर्डमध्ये (अलगीकरण कक्ष) आहेत. यातील सात जण बुलडाणा येथील, तीन जण खामगाव येथील तर दोन जण शेगाव येथील आयसोलेशन कक्षात आहेत.

१२७ जणांना सुटीजिल्ह्यात ११ मार्च पासून खºया अर्थाने कोरोना संसर्गाच्या संदर्भाने प्रशासन अधिक संवेदनशील झाले होते. तेव्हापासून आजपर्यंत होम क्वारंटीन, हॉस्पीटल क्वारंटीनमध्ये असलेल्या १०९ लोकांना तर आयसोलेशन कक्षात असलेल्या १८ जणांना अशा एकूण १२७ जणांना सुटी देण्यात आली आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbuldhanaबुलडाणा