शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana : नऊ दिवसात २४ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 10:50 IST

जिल्ह्यात कोरोना संसर्गाची लागण सुरूच असून जून महिन्यात ९ दिवसात २४ जणांना लागण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची लागण सुरूच असून जून महिन्यात ९ दिवसात २४ जणांना लागण झाली आहे. तर गेल्या ३० दिवसात जिल्ह्यात ६९ रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या संक्रमणाचा वेग जिल्ह्यात वाढला आहे. दरम्यान मंगळवारी सायंकाळी पातुर्डा येथील एक रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आला आहे.वर्तमान स्थितीत जिल्ह्यात ९३ रूग्ण असून यापैकी २९ रूग्णांवर सद्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर तिन रूग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. दुसरीकडे ६१ रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ६६ टक्क्यांवर पोहोचले आहे.बुलडाणा जिल्ह्यात २८ मार्च रोजी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला होता. पश्चिम वºहाडातील हा पहिलाच मृत्यू असल्याने बुलडाणा जिल्हा चर्चेत आला होता. मात्र त्यानंतर आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, महसूल आणि जिल्हा परिषदेच्या पथकांव्दारे कोरोना बाधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग प्रो अ‍ॅक्टीव पध्दतीने हाती घेण्यात आल्यामुळे जिल्ह्यात संक्रमीत रूग्ण शोधण्यास मोठी मदत झाली. त्यामुळे वर्तमान स्थितीत जिल्ह्यात ९३ रूग्ण जरी दिसत असले तरी जिल्ह्याची स्थिती लगतच्या जिल्ह्यांच्या तुलनेत नियंत्रणात असल्याचे चित्र आहे.मंगळवारी पातुर्डा येथील एक रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आला आहे. सद्या तो शेगाव येथील आयसोलेशन कक्षात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बाळापूर येथे तो काही दिवसाअगोदर गेला होता. परत आल्यानंतर निमोनियाचा त्रास त्याला सुरू झाला. दुसरीकडे मलकापूर येथे शहरातील नागरिकांचे सर्व्हेक्षण सुरू झाले असून ९ जून रोजी शहरातील ४ हजार कुटुंबातील १८ हजार नागरिकांचे आरोग्य विषयक सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये १६८ व्यक्ती दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचे समोर आले आहे.   ८ जणांना ‘डिस्चार्ज’मंगळवारी कोरोनामुक्त झालेल्या ८ जणांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये मलकापूर मधील ५, शेलापूर येथील २ आणि साखरखेर्डा येथील एकाचा समावेश आहे. सुटी झालेल्यांमध्ये ४ महिला, १ युवती आणि ३ पुरूषांचा समावेश आहे. बुलडाणा शहरात मच्छी ले आऊटमध्ये एक जण सोमवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे हा परिसर सील केला.२६ अहवाल निगेटिव्हमंगळवारी २६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यास दिलासा मिळाला असला तरी पातुर्डा येथील एक रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आला आहे.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा