शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

CoronaVirus in Buldhana : आपत्कालीन स्थितीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 12:21 IST

जवळपास दहा व्हेंटीलेटर उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे.

ठळक मुद्देशहरातील चार रुग्णालयामध्ये २५ बेड उपलब्ध करण्यात आले आहेत.सामाजिक जबाबदारी म्हणून खासगी रुग्णालये ही सुविधा देण्यास तयार आहेत.

- नीलेश जोशी  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्गाचा उद्रेक बुलडाणा जिल्ह्यात झाला नसला तरी भविष्यातील संभाव्य धोका विचारात घेता आरोग्य यंत्रणेनेही त्या दिशने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, बुलडाणा शहरासह लगतच्या शहरातील डॉक्टरांनी आपत्कालीन स्थितीच्या दृष्टीने त्यांच्या रुग्णालयातील जवळपास दहा व्हेंटीलेटर उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे.दुसरीकडे प्रसंगी जिल्ह्यात संसर्गाचा धोका हा सामाजिक संक्रमणापर्यंत पोहोचल्यास प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोणातून आरोग्य यंत्रणेने पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. त्यादृष्टीने आयएमए, फॉर्मासिस्ट, अन्न व औषध प्रशासन विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हाधिकारी यांची पालकमत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बैठख घेऊन आढावा घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर बुलडाणा शहरातील चार रुग्णालयामध्ये २५ बेड उपलब्ध करण्यात आले आहेत.सोबतच कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णासाठी गरज पडल्यास दहा व्हेंटीलेटरही राखीव ठेवण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयाकडील हे व्हेंटीलेटर आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील खासगी प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांनी प्रसंगी त्यांची सेवाही आरोग्य विभागास देण्याची तयारी दर्शवली आहे.सामाजिक जबाबदारी म्हणून खासगी रुग्णालये ही सुविधा देण्यास तयार आहेत. दुसरीकडे कोरोना संदर्भात सेवा देण्यासाठी खासगी डॉक्टर तयार झाले असले तरी त्यांना पीपीई (सुरक्षा किट) उपलब्ध करण्याची गरज असल्याचेही आयएमएच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे खासगी रुग्णालयेही जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्यास तयार असून त्यादृष्टीने उभय यंत्रणामध्ये समन्वय आहे. खासगी हॉस्पीटलचेही रुग्ण स्क्रीनींगसाठी मदत घेतल्या जात असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पंडित यांनी सांगितले.

स्त्री रुग्णालयाचीही दुरुस्ती व्हावीजिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरात सुसज्ज असे १०० खाटांचे स्त्री रुग्णालय उपलब्ध आहे. येथे पाणीपुरवठ्यासह आॅक्सीजन पुरवठ्याची तजबीज त्वरित केल्यास हे रुग्णालय कोरोना संसर्गाच्या आपत्तीत जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. राज्यात अशा पद्धतीची सुसज्ज व काहीशी बाजूला असलेली नवीन इमारत ही फक्त बुलडाण्यात उपलब्ध आहे. त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणेने आता गांभिर्याने काम करण्याची गरज असल्याचेही आयएमएच्या पदाधिकाºयांनी सांगितले.

एकाच ठिकाणी रुग्ण ठेवावेकोरोना संशयीत रुग्ण हे एकाच ठिकाणी ठेवण्यास प्राधान्य दिले जावे, अशी मागणीही आयएमएचे सचिव डॉ. जयसिंग मेहेर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. दरम्यान, इटली, चीनमध्येही कोरोना संशयीत रुग्ण हे एकाच ठिकाणी ठेवण्यात आले होते. त्यामुळे इतरांना संसर्ग होण्याचा धोका टळतो, असे ते म्हणाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस