शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana : आणखी पाच पॉझिटिव्ह ; एकूण रूग्ण संख्या ३५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 10:51 IST

बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता ३५ झाली असून सात रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/खामगाव: जिल्ह्यात बुधवारी पुन्हा पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून यामध्ये शेगाव येथील सफाई कर्मचाऱ्याची पत्नी, मोताळा तालुक्यातील आव्हा येथील युवकासह आलमपूर येथील एका व्यक्तीसह जळका भडंग येथील युवक,खामगाव तालुक्यातील उमरा येथील ७० वर्षीय वृद्धाचा समावेश आहे.परिणामी बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता ३५ झाली असून सात रुग्णांवर सध्या शेगाव, खामगाव आणि बुलडाणा येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तीन रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून २३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दुसरीकडे २० मे रोजी सकाळी शेगाव येथील सफाई कर्मचाºयाची पत्नी पॉझिटिव्ह आढळून आली. त्या पाठोपाठ मोताळा तालुक्यातील आव्हा गावातील एक २२ वर्षीय युवक पॉझिटिव्ह आढळून आला आहे. १२ मे रोजी भांडूप परिसरातून आठ व्यक्तींसमवेत तो गावी आला होता.१३ मे रोजी त्याची प्रकृती खराब झाल्याने त्यास लिहा बुद्रूक व नंतर पिंपळगाव देवी येथे नेण्यात आले होते. तेथून नंतर त्याला बुलडाणा हलविण्यात आले होते. त्याचा अहवाल २० मे रोजी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांसह काही नातेवाईक असे एकूण नऊ जण व खामगाव तालुक्यातील दधम येथील संपर्कातील पाच जणांना आरोग्य विभागाने तापासणीसाठी ताब्यात घेतले आहे. शेगाव येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील २९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. मात्र सफाई कामगाराची पत्नी पॉझिटिव्ह आढळून आली आहे. तिच्या संपर्कात असलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे.खामगाव तालुक्यात दोन पॉझिटिव्ह!खामगाव: बुधवारी सायंकाळी आलेल्या अहवालात खामगाव तालुक्यातील दोन जण पॉझिटिव्ह आले. यामध्ये जळका भंडग, उमरा येथील व्यक्तीचा समावेश आहे. येथील २५ वर्षीय युवक पॉझिटीव्ह आढळून आला. प्रशासनाच्यावतीने जळका भंडग सील करण्यात आले आहे. खामगाव शहरातील १४ जणांचा अहवाल निगेटीव्ह आढळून आल्याने बुधवारी सकाळी खामगावकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.अलमपुरातील युवक पॉझिटिव्ह; उपचार सुरूनांदुरा: शहरालगत असलेल्या अलमपूर येथील एक जण बुधवारी सायंकाळी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. सध्या त्यावर खामगाव येथील कोवीड रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसापूर्वी हा व्यक्ती मुंबईतून आलमपूर येथे आला होता. एकच दिवस तो गावात थांबला होता. मात्र त्याला त्रास होऊ लागल्याने लगोलग त्याला खामगाव येथील कोवीड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथून त्याचा स्वॅब नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तो पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, गाव सील करण्याच्या दृष्टीने नांदुºयातील आरोग्य विभाग आलमपूरमध्ये दाखल होत असून रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा ते शोध घेत आहेत. 

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याkhamgaonखामगावNanduraनांदूरा