शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

CoronaVirus in Buldhana : आणखी दोघांचा मृत्यू; ८८ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 11:15 IST

रविवारी बुलडाणा तालुक्यातील जागदरी व चिखली तालुक्यातील जांभोरा येथील अनुक्रमे ६८ व ६५ वर्षीय व्यक्तींचा यात समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:  जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून 30 आॅगस्ट रोजी आणखी दोघांचा मृत्यू झाला असून ८८ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी बुलडाणा तालुक्यातील जागदरी व चिखली तालुक्यातील जांभोरा येथील अनुक्रमे ६८ व ६५ वर्षीय व्यक्तींचा मृत्यू झाला.जिल्ह्यातील एकूण बाधीत रुग्णांची संख्या ३, ०७१ वर पोहेचली आहे. रविवारी पुन्हा ८८ जण कोरोना बाधीत झाल्याचे तपासणीत समोर आले चार दिवसात मृत्यू पावलेल्यांमध्ये बुलडाण्यातील २५ वर्षीय महिलेचा अपवाद वगळता अन्य मृतक हे ६० पेक्षा अधिक वर्षाचे आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा चार, शेळगाव आटोळ दोन, अंत्री खेडेकर एक, भालगाव दोन, सोयगाव एक, धाड एक, चिखली १८, शेगाव पाच, जवळखेड १, बायगाव दोन, मेंगाव चार, नायगाव एक, पिंपळगाव काळे एक, शेंदुर्जन दोन, दुसरबीड एक, देऊळगाव कोळ एक, वाघाळा एक, सिंदखेड राजा १३, मलकापूर तीन, देऊळगाव राजा दोन, मेहकर एक, लोणार तीन, बरटाळा एक, वानखेड १, सोनाळा १, धामणगाव बढे एक, जळगाव जामोद एक, खामगावमधील १२ जणांचा यात समावेश आहे. आतापर्यंत कारोनामुक्त झालेल्या २,१२४ जणांना सुटी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ४८ जणांचा मृत्यूगेल्या पाच महिन्यात जिल्ह्यात कोरोनामुळे ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात दररोज कोरोनामुळे किमान एका बाधीताचा मृत्यू होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे बाधीतांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचा कोरोनाचा मृत्यूदर सध्या १.५६ वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३० आॅगस्ट रोजी ६९.१६ टक्के आहे. दुसरीकडे रविवारी १८ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्ह्यात ८९९ बाधीतांवर उपचार होत आहेत.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या