शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

CoronaVirus In Buldhana : आणखी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह;  रुग्णांची संख्या चारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 10:13 IST

आतापर्यंत बुलढाणा शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या चार झाली आहे.

ठळक मुद्देआणखी एका नमुन्याचा अहवाल बुधवारी सकाळी प्राप्त झाला तो पॉझिटिव्ह आला आहे. बत्तीस जणांचे स्वाब नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.

बुलढाणा: कोरोना विषाणूचा  संसर्ग झालेला आणखी एक रुग्ण बुलढाणा मध्ये सापडला आहे. नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या बत्तीस नमुन्यांपैकी आणखी एका नमुन्याचा अहवाल बुधवारी सकाळी प्राप्त झाला तो पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बुलढाणा मध्ये गेल्या दोन दिवसापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे आतापर्यंत बुलढाणा शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या चार झाली आहे. पैकी एका रुग्णाचा 28 मार्च रोजी मृत्यू झाला होता. दरम्यान त्यानंतर या मृत व्यक्तीच्या संपर्कातील तथा कुटुंबातील जवळपास 66 जणांना हॉस्पिटल कुवारंटी करण्यात आले होते. त्यापैकी निकट संपर्कात असलेल्या बत्तीस जणांचे स्वाब नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी मृतकाच्या कुटुंबातील दोघांचे अहवाल 31 मार्च रोजी पॉझिटिव्ह आले होते. तर आज मृत व्यक्तीच्या संपर्कातील 23 वर्षीय व्यक्तीचा स्वाब नमुन्याचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. दुसरीकडे अकोला येथील आरोग्य उपसंचालक डॉक्टर आर .एस. फारुकी यांनी 31 मार्च रोजी बुलढाणा शहरास भेट दिली . सोबतच हाय रिस्क झोनची ही त्यांनी पाहणी केली. यावेळी या क्षेत्रातील सोळा हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. बुलढाणा येथून 29 मार्च रोजी पाठविण्यात आलेल्या 32 स्वाब नमुन्यांपैकी अद्याप आठ नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहेत. ते बुधवारी सायंकाळपर्यंत मिळण्याची शक्यता असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित यांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस