शहरं
Join us  
Trending Stories
1
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
2
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
3
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्म-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
4
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
5
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
6
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
7
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
8
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
9
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
10
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
11
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
12
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
13
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
14
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
15
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
16
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
17
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
18
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट
19
फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर
20
Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी

CoronaVirus in Buldhana : आणखी एक मृत्यू; १२९ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 12:06 IST

मंगळवारी १२९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

बुलडाणा : कोरोना संक्रमणाची व्याप्ती जिल्ह्यात झपाट्याने वाढत असून २२ सप्टेंबर रोजी एकूण कोरोना बाधीतांच्या संख्येने सहा हजारांचा टप्पा ओलांडला असून सध्या जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या ६,०८० झाली आहे. दरम्यान, मंगळवारी १२९ जणांचे अहवाल पॉझिटिव्हआले असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.दुसरीकडे मंगळवारी प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या व रॅपीड टेस्टमध्ये तपासम्यात आलेल्यांपैकी ६८३ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये १२९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर ५५४ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालापैकी ११५ तर रॅपीड टेस्टमधील १४ जणांच्या अहवालाचा समावेश आहे.पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये खामगाव येथील १६, टेंभुर्णा एक, आंबेटाकळी तीन, बेलोरा एक, येराळी एक, जळगांव जामोद चार, कोथळी एक, वडगाव एक , चिखली आठ, मेरा खु. एक, ब्रम्हपुरी सात, महिमाळ एक, शिंदी हराळी एक, अंबाशी दोन, पेठ एक, बुलडाणा १७, धरणगाव एक, दाताळा दोन, मलकापूर १२, शेगाव दोन, साखरखेर्डा तीन, सावखेड नजीक दोन, तडेगाव एक, गाडेगाव एक, देऊळगाव राजा सहा, हिवरा आश्रम एक, गिरोली एक, देऊळगाव धनगर एक, निमखेड एक, धोत्रा एक, देऊळगाव मही दोन, धाड दोन, देऊळघाट एक, तांदुळवाडी एक, मेहकर सात, नांदुरा १३ आणि वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील एक,अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील एका संशयिताचा बाधीत रुग्णांमध्ये समावेश आहे. दरम्यान, मलकापूर येथील ५८ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्युचे होण्याचे प्रमाण सध्या १.२५ टक्के आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या