शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Buldhana : आणखी ५५ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या २,७४४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 19:03 IST

बुधवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या व रॅपीड टेस्टमध्ये तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांपैकी ४४० जणांचे अहवाल प्राप्त झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सरासरी ५० कोरोना बाधीत रुग्ण दररोज सापडत असून मंगळवारीही जिल्ह्यात ५५ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णांची संख्या २,७४४ झाली आहे. दरम्यान, यापैकी ७६१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. बुधवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या व रॅपीड टेस्टमध्ये तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांपैकी ४४० जणांचे अहवाल प्राप्त झाले.बुधवारी ३८५ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले तर ५५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सागवन येथील एक, नांदुरा येथील तीन, खामगावमधील १२, देऊळगाव राजामधील एक, धोत्रा नंदई मधील एक, बीबी येथील नऊ, चिखली येथील तीन, किन्ही सवडत येथील एक, बुलडाण्यातील एक, मासरूळ येथील एक, मेहकर येथील १५, शेगाव येथील सहा, जलंब येथील एक या प्रमाणे रुग्णांचा समावेश आहे.४६ रुग्णांनी बुधवारी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यात देऊळगाव राजा येथील एक, देऊळगाव मही येथील एक, बावनबीर येथील एक, बुलडाण्यातील सात, चांडोळ येथील एक, लोणार येथील एक, वरवट बकाल येथील एक, वडनेर भोलजी येथील एक, दिवठाणा येथील एक, मोताळा येथील एक, धामणगाव बढे येथील एक, दाताळा येथील एक, नांदुरा येथील चार, खामगावमधील सहा, शेगावमधील दोन, देऊळगाव राजा एक, चिखलीमधील एक, अमडापूर एक, शेलगाव आटोळ एक, सोनेवाडी एक, साखळी एक, साखरखेर्डा एक, सुलतानपूर सहा रुग्णांचा समावेश आहे.

२७ अहवालांची प्रतीक्षाजिल्ह्यातील १६ हजार १८ संदिग्ध व्यक्तींचे अहवाल आतापर्यंत निगेटीव्ह आले असून बाधीत रुग्णांपैकी १,९४१ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अद्यापही एक हजार २७ संदिग्ध व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात सध्या २,७४४ कोरोनाबाधीत रुग्ण असून त्यापैकी अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ७६१ असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, ४२ कोरोना बाधीतांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या