CoronaVirus in Buldhana : ४७ जणांच्याअहवालाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 05:18 PM2020-04-29T17:18:31+5:302020-04-29T17:18:48+5:30

धर्मप्रचारक म्हणून आलेल्या अल्पसंख्यांक समाजातील २६ अशा ४७ जणांच्या पाठविण्यात आलेल्या स्वॅब नमुन्यांची अद्याप प्रतीक्षा आहे.

CoronaVirus in Buldhana: 47 people awaiting report | CoronaVirus in Buldhana : ४७ जणांच्याअहवालाची प्रतीक्षा

CoronaVirus in Buldhana : ४७ जणांच्याअहवालाची प्रतीक्षा

Next

बुलडाणा: कोरोना चाचणी पॉझीटीव्ह आलेल्या कामठीतील तीन जणांसह त्यांच्या सहकाºयांच्या संपर्कात आलेल्या ३९ पोलिस कर्मचाºयांपैकी २१ पोलिस कर्मचाºयांचे आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी धर्मप्रचारक म्हणून आलेल्या अल्पसंख्यांक समाजातील २६ अशा ४७ जणांच्या पाठविण्यात आलेल्या स्वॅब नमुन्यांची अद्याप प्रतीक्षा आहे.
दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात पश्चिम बंगाल, सुरत, कामठीसह अन्य ठिकाणाहून आलेल्या धर्मप्रचारकांची सध्या पोलिस प्रशासनाने दिलेल्या पत्रानुसार आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. कामठीमधील धर्मप्रचारकांच्या संपर्कात आलेल्या बुलडाणा पोलिस दलातील ३९ कर्मचारी, अधिकाºयांपैकी १५ जणांचे स्वॅब हे २८ मार्च रोजी रात्री उशिरा तर  सहा जणांचे २९ एप्रिल रोजी सकाळी स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत. दरम्यान, मुंबई येथून शेगाव परिसरात आलेल्या तीन जणांचेही स्वॅब नमुने घेण्यात आले असून धर्मप्राचरकांपैकी सुरत वरून आलेल्या आठ जणांची खामगाव येथील रुग्णालयात तपासणी करण्यात येऊन त्यांचेही स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत.

दुसरीकडे २९ एप्रिल रोजी  आरोग्य विभागास प्राप्त झालेल्या १६ व्यक्तींचे स्वॅब नमुने हे निगेटीव्ह आल्याने जिल्ह्यास एक मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र उर्वरित ४७ जणांचे स्वॅब नमुने अद्याप प्रतीक्षत आहेत. त्यांचे अहवाल नेमके काय येतात, याकडे सध्या जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. २८ मार्च रोजी क्वारंटीन करण्यात आलेले ३९ पोलिस कर्मचारी व अधिकारी हे सध्या शेगाव येथे इन्स्टीट्युशनल क्वारंटीन झाले आहेत.

Web Title: CoronaVirus in Buldhana: 47 people awaiting report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.