शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana : आपत्कालीन स्थितीसाठी ३,६१० बेडची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 11:10 IST

संभाव्य आपत्कालीन स्थिती पाहता तीन हजार ६१० बेडची व्यवस्था जिल्ह्यात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देखामगाव, शेगाव आणि बुलडाणा येथे तीन आयसोलेशन कक्षही उभारण्यात आले आहेत. प्रामुख्याने कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण हे बुलडाणा येथे ठेवण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले असून आधी पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांपैकी ८ रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, गेल्या सात दिवसापासून जिल्ह्यात एकही कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. दुसरीकडे आगामी काळातील संभाव्य आपत्कालीन स्थिती पाहता तीन हजार ६१० बेडची व्यवस्था जिल्ह्यात करण्यात आली आहे.कोरोना संसर्गास जिल्ह्यात प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने थ्री टायर सिस्टीमप्रमाणे यंत्रणा कार्यान्वीत केली आहे. यामध्ये कोवीड केअर सेंटर, डेडिकेटेड कोवीड केअर सेंटर आणि डेडीकेटेड कोवीड केअर हॉस्पीटल या प्रमाणे ही यंत्रणा कार्यरत असून खामगाव, शेगाव आणि बुलडाणा येथे तीन आयसोलेशन कक्षही उभारण्यात आले आहेत. प्रामुख्याने कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण हे बुलडाणा येथे ठेवण्यात येत आहेत.या व्यतिरिक्त जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या सुरक्षेसाठी वर्तमान स्थितीत वैयक्तिक सुरक्षा उपकरणे, मास्क तथा तत्सम यंत्रणा उभारण्यात आली आहे. जिल्ह्यात परप्रांतातून आलेल्या चार हजार १९२ मजुरांसाठी तब्बल ४० कॅम्प उघडण्यात आलेले असून सातत्याने गेल्या एक महिन्यापासून त्यांना कॅम्पमध्ये समुपदेशनही करण्यात येत आहे.१३३५ पीपीई किट आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी जिल्ह्यात सध्या १३३५ पीपीई किट (पर्सनल प्रोटेक्शन इक्युपमेंट) सध्या उपलब्ध आहेत. सोबतच एन ९५ व तत्सम चांगले असे चार हजार १८५ मास्क उपलब्ध करण्यात आलेले असून १३ व्हेंटीलेटरचीही जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. 

२२८ युनीट रक्त उपलब्धउन्हाळ््यात साधारणत: रक्ताची उपलब्धता कमी असते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर आतापर्यंत आठ कॅम्प घेण्यात येऊन त्याद्वारे २२८ युनीट रक्त उपलब्ध करण्यात आलेले आहे. गरजेनुसार आणखी रक्ताची गरज पडल्यास रक्तदान शिबीर घेऊन ते उपलब्ध करण्यात येईल. यादृष्टीनेह प्रशासकीय पातळीवर नियोजन आहे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा