शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana : ३३ संदिग्ध रुग्णांचे अहवाल आले निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 11:13 IST

३३ संदिग्ध रुग्णाचे अहवाल हे निगेटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी ३३ संदिग्ध रुग्णाचे अहवाल हे निगेटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे. गेल्या आठ दिवसापासून सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी हा दिलासा मिळाला.नाही म्हणायला शनिवारी रात्री मलकापूरमधील तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे मलकापूरमध्ये पुन्हा खळबळ उडाली होती. सध्या जिल्ह्याच्या दृष्टीने जळका भडंग नंतर मलकापूर कोरोना संसर्गाच्या दृष्टीने हॉटस्पॉट ठरलेला आहे.दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यातील चाचणी करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी एक हजार २१६ व्यक्तींचे अहवाल हे निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत ५९ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. पैकी तीन जणांचा मृत्यू झाला असून ३३ जणांची कोरोना मुक्त झाल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मात्र दहा मे नंतर बुलडाणा जिल्ह्यात तब्बल ३५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सध्या आयसोलेशन कक्षामध्ये २३ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.जिल्ह्यात एक लाखा पेक्षा अधिक नागरिक हे पुणे, मुंबई व अन्य शहरी भागातून आल्याने त्यांच्यामध्ये असलेल्या काही संक्रमीत व्यक्तींमुळे बुलडाणा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढलेला असला तरी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सर्व्हीलन्स टिम, महसूलचे पथक, आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासन यांच्यातील समन्वयामुळे जिल्ह्यात वाढू पाहणारे हे संक्रमणही मर्यादीत स्वरुपात ठेवण्यात यंत्रणेला तुर्तास तरी यश आल्याचे चित्र आहे.गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत सव्वा लाखापेक्षा अधिक नागरिकांची आरोग्य विभागाच्या पथकांनी सर्व्हेक्षणादरम्यान प्रतिबंधीत क्षेत्रात तपासणी केली आहे. जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण चार टक्के आहे.दरम्यान, अद्यापही ४८ स्वॉब नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल येणे बाकी आहे. प्रामुख्याने यामध्ये मलकापूर शहरातील व्यक्तींचा समावेश आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या