शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus :  बुलडाणा जिल्ह्यात ७२ हजार नागरिक परतले; चिंतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 10:47 IST

परतणाऱ्या या नागरिकांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढण्यासोबतच जिल्ह्यात संक्रमणाचा धोका गडद होत असून चिंतेतही भर पडतेय.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : परदेशासह मुंबई, पश्चिम महाराष्ट्रातून जिल्ह्यात तब्बल ७२ हजार ३९६ नागरिक गेल्या काही दिवसात दाखल झाले असून १४७ व्यक्तींमध्ये सर्दी, ताप व खोकल्याची लक्षणे आढळून आली आहे. सातत्याने स्वगृही परतणाऱ्या या नागरिकांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढण्यासोबतच जिल्ह्यात संक्रमणाचा धोका गडद होत असून चिंतेतही भर पडतेय.नागरिकांचे हे स्वगृही सुरू झालेले स्थलांतर पाहता ग्रीन झोनकडे वाटचाल करणाºया बुलडाणा जिल्ह्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. नरवेल आणि मलकापूर पांग्रा येथील दोन्ही प्रकरणे त्याचे जिवंत उदाहरण आहेत.दुसरीकडे शासकीय स्तरावर अधिकृत आकडेवारी ही ७२ हजार ३९६ च्या आसपास असली तरी अनधिकृतरित्या अनेक नागरिक जिल्ह्यात दाखल होत असून जवळपास दीड लाखांच्या घरात हा आकडा जाऊ शकतो, असे सुत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे वर्तमान स्थितीत कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढत असल्याची भावना निर्माण होत आहे. आज घडीला जवळपास ८०० च्या आसपास प्रत्यक्षात कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांच्या स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात येत असून ७५० च्या आसपास प्रत्यक्षात स्वॅब नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत.

जिल्ह्यात दाखल झालेल्या ७२ हजार ३९६ नागरिकांपैकी ७२ हजार १५५ नागरिकांच्या हातावर क्वारंटीनचे शिक्के मारण्यात आले असून त्यांना होम क्वारंटीन राहण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. २२९ नागरिकांची मात्र तपासणी होऊ शकली नाही. विशेष म्हणे शेगाव तालुक्यातील या नागरिकांची तपासणी राहलेली आहे. जिल्ह्यातील ८६९ ग्रामपंचायतींमध्ये दाखल होणाºया नागरिकांची ही संख्या असून शहरी भागातील संख्या ही वेगळी आहे. गेल्या दहा दिवसातच जवळपास २२ हजार व्यक्ती स्वगृही परतल्याचा अंदाज आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत जिल्ह्यात ३९ हजार नागरिक स्वगृही परतले होते. त्यामुळे आता आणखी काही नागरिक हे जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा