शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात आणखी २१ पॉझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 19:30 IST

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून १७ आॅगस्ट रोजी आणखी २१ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून १७ आॅगस्ट रोजी आणखी २१ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तसेच ८४ अहवाल निगेटिव्ह आले असून ४६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्याची रुग्णसंख्या २२५२ वर पोहचली असून १३९९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण १०५ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ८४ अहवाल कोरोना निगेटिव्ह आहेत.प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील १५ व रॅपिड टेस्टमधील ६ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील १८ तर रॅपिड टेस्टमधील ६६ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे ८४ अहवाल निगेटीव्ह आहेत.पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील गाडगे नगर येथील एक , सरस्वती नगर एक, विष्णूवाडी एक, माळेगांव ता. मोताळा एक, हनवतखेड ता. सिं.राजा येथील दोन, खामगांव येथील एक , लालपूरा एक, सुदर्शन नगर एक, गोपाल नगर चार , सुटाळा दोन, वाडी दोन, भालेगांव बाजार ता. खामगाव येथील तीन, जोशीनगर एक संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. तसेच आज ४६ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सुट्टी देण्यात आलेले रुग्णांमध्ये खामगांव पोलीस वसाहतीतील दहा , जानकी कॉम्प्लेक्स एक, सुटाळा एक, शिक्षक कॉलनी दोन, शंकर नगर एक, सती फैल दोन, झोडगा वसर ता. खामगांव एक , पिं.काळे ता. जळगांव जामोद येथील एक, सुलतानपूर ता. लोणार येथील एक , मेहकर येथील सहा, जानेफळ ता. मेहकर येथील एक, घाटबोरी ता. मेहकर येथील एक , लोणार येथील १० , चिखली येथील सहा , येसापूर ता. लोणार येथील एक, दहीफळ ता. लोणार येथील एक रुग्णाचा समावेश आहे.

२४३ अहवाल प्रतिक्षेतआजपर्यंत १४ हजार २१६ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १३९९ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण २२५२ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी १३९९ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ८१३ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ४० कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या