शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बुलडाण्यात आणखी १५ पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या २१३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 11:07 IST

दोन दिवसात ३० रुग्णांची भर जिल्ह्यात पडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणाा : सलग दुसऱ्या दिवशी बुलडाणा जिल्ह्यात १५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या २१३ वर पोहोचली आहे. दोन दिवसात ३० रुग्णांची भर जिल्ह्यात पडली आहे.रविवारी ३१ अहवाल जिल्हा प्रशासनास पात्र ठरले. त्यापैकी १६ अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये मलकापूरमधील ४० वर्षीय महिला, शेगावातील जोगडी फैलमधील एक महिला व काँग्रेसनगरमधील एक पुरुष तर वरवट बकाल येथील ५१ वर्षीय व्यक्तीचा यात समावेश आहे. आळसणा येथील सहा तर जळगाव जामोद मधील ५३, ५६ आणि ६७ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहेत. संग्रामपूर तालुक्यातील निवाना येथेही ३४ व ३६ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, शेगावातील जोगडी फैल, नांदुरा येथील एक, मलकापुरमधील पारपेट, पातुर्डा येथील तीन जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता १४४ वर पोहोचली आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात ६८ टक्क्यांवर पोहोचले आहे.अद्याप १२६ अहवाल अकोला येथील प्रयोग शाळेतून अप्राप्त आहे. दरम्यान, आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांपैकी दोन हजार ४३४ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या २१३ झाली असून त्यापैकी १४४ जण कोरोना मुक्त झाले असल्याने प्रत्यक्षात ५८ सक्रीय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ११ कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी दिली. आळसणा येथे सहा जण निघाले पॉझिटिव्हशेगाव तालुक्यातील आळसणा येथे तब्बल सहा जण पॉझिटिव्ह आले आहे. पातुर्ड्याप्रमाणेच आता येथे कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. आळसणा येथे ४५, ७२ वर्षीय महिला, १६ वर्षांची मुलगी, १८ वर्षाचा तरुण, ११ वर्षाचा मुलगा आणि ३३ वर्षीय एका व्यक्तीचा समावेश आहे. एकाच दिवशी येथे सहा कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आळसणा येथेही जनता कर्फ्यु लावण्याची गरज निर्माण झाली आहे. शेगावातही दोन जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा