शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले १३ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 11:10 IST

१२ रुग्ण खामगाव, नांदुरा, शेगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील असून एक रुग्ण सुलतानपूर येथील आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : दोन दिवसानंतर पुन्हा बुलडाणा जिल्ह्यात तब्बल १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून यापैकी १२ रुग्ण खामगाव, नांदुरा, शेगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील असून एक रुग्ण सुलतानपूर येथील आहे. दरम्यान, यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या १८३ वर पोहोचली आहे.तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी २८ अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. यापैकी १५ अहवाल निगेटीव्ह आले असून १३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये लोणार तालुक्यातील सुलतनापूर येथील ४२ वर्षीय महिला, मलकापूरमधील काळीपुरा भागातील वृद्ध व्यक्ती, संग्रामपुर तालुक्यातील बावनबीर येथील एक जण, शेगावातील शादीखाना येथील ६० वर्षीय पुरुष, तसेच याच तालुक्यातील आळसना येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा यात समावेश आहे. या व्यतिरिक्त खामगाातील २७ वर्षीय महिला, अकोला येथील रामदास पेठ मधून आलेला २० वर्षीय तरूण, आठ, व १२ वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर नांदुरा येथील दहा आणि १२ आणि १३ वर्षीय मुलगी व एका २४ वर्षाच्या युवकाचा यात समावेश आहे. गेल्या काही दिवसापासून या व्यक्ती आयसोलेशनमध्येच होत्या. शुक्रवारी तीन कोरोनाबाधित व्यक्ती बऱ्या झाल्याने त्यांना वैद्यकीय संकेतानुसार रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये जळगाव जामोद येथील एक, मलकापूरमधील भीमनगरमध्ये राहणारा एक युवक व मलकापूर येथीलच ५८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. एकाच दिवशी कोरोनाचे १३ रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या