शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : १२ विदेशी नागरिक 'क्वारंटीन', 'आयसोलेशन' कक्षात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 17:44 IST

१५ मार्च रोजी विदेशातील हे नागरिक शेगाव व खामगाव येथील एका धार्मिक कार्यक्रमासाठी आले

बुलडाणा: शेगाव आणि खामगाव येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी इंडोनेशिया आणि मलेशियातून आलेल्या १२ विदेशी नागरिकांना आरोग्य विभागाने क्वारंटीन व  विलगीकरण कक्षात दाखल केले आहेत. यातील तीन जणांना सर्दी, कफ व तापाची लक्षणे आढळून आल्यामुळे त्यांना खामगाव येथील विलगीकरण कक्षात (आयसोलेशन) ठेवण्यात आले आहे. दरम्यान, उर्वरित नऊ जणांना बुलडाणा येथील नव्याने बांधण्यात आलेल्या महिला रुग्णालयातील क्वारंटीन (विलगीकरण) कक्षात ठेवण्यात आले आहे.१५ मार्च रोजी विदेशातील हे नागरिक शेगाव व खामगाव येथील एका धार्मिक कार्यक्रमासाठी आले असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. सोबतच त्यांनी खामगाव येथील एक धार्मिक स्थळ गाठल्याचे समोर आले होते. आरोग्य विभागाच्या पथकाने या नागरिकांची तपासणी केली असता त्यापैकी तिघांना ताप, सर्दी व कफाची लक्षणे आढळून आल्याने त्यांना त्वरित खामगाव येथील विलगीकरण कक्षात(आयसोलेशन) ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित नऊ जणांना क्वारंटीनसाठी (विलगीकरण) बुलडाणा येथील रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. आगामी १४ दिवस त्यांच्यावर निगराणी ठेवण्यात येणार आहे. दररोज त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून ताप, सर्दी त्यांना आहे किंवा नाही, याचा अहवालही नियमित स्वरुपात घेण्यात येणार आहे. एकीकडे चिखलीतील वृद्धाचा मृत्यू कोराना मुळे झाला नसल्याचे स्पष्ट झालेले असतानाच आता नव्याने विदेशी १२ नागरिकांना आरोग्य विभागाने मॉनिटरींगखाली घेतले आहे. बुलडाणा जिल्ह्यात शेगाव, खामगाव आणि बुलडाणा येथे आयसोलेशन वार्ड उभारण्यात आले असून बुलडाणा येथे एक क्वारंटीन (विलकीकरण कक्ष) उभारण्यात आलेला आहे.

एका अल्पवयीन मुलाचाही समावेशइंडोनेशियातून सात आणि मलेशियातून पाच विदेशी नागरिकांचे आरोग्य विभागाने मॉनिटरींग सुरू केले आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. आगामी १४ दिवस ते आरोग्य विभागाच्या निगरानीमध्ये राहतील. कोरोना व्हायरसचाही रिस्क पिरेड हा साधारणत: १४ दिवसांचा असतो.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkhamgaonखामगावShegaonशेगाव