शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बुलडाण्यात १० नवे पॉझिटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 16:27 IST

गेल्या दोन दिवसांमध्ये बुलडाणा शहरातील वेगवेळ्या भागामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असताना आता बुलडाणा शहरातही कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये बुलडाणा शहरातील वेगवेळ्या भागामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ३ आॅगस्ट रोजी आणखी १० नवे पॉझिटिव्ह बुलडाण्यात सापडले आहेत. जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या १ हजार ४०० च्यावर पोहचली आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग आता वाढलेला आहे. त्या पाठोपाठ बुलडाणा शहर परिसरातही रुग्ण सापडण्याचे वाढल्याचे चिंताजनक चित्र आहे. सोमवारी पुन्हा १० पॉझिटिव्ह बुलडाणा शहरात सापडल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील विविध भागात कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये बुलडाण्यातील लांडे ले आऊटमध्ये ३५ वर्षीय डॉक्टर पॉझिटिव्ह आढळले. सरस्वती नगर मधील २९ वर्षीय महिला व ४० वर्षीय पुरुष, बाजार समिती परिसरात ४३ वर्षीय व ७७ वर्षीय महिला, सुवर्ण नगर मध्ये ६३ वर्षाचा वृद्ध, संगम चौकात ४५ वर्षीय महिला, भीमनगरमध्ये ७६ वर्षीय वृद्ध, जिजामाता नगर मधील ५८ वर्षीय पुरुष व आणखी एक ४५ वर्षीय पुरुष असे एकूण १० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. रॅपिड टेस्ट मध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू होती.रविवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३५८ अहवाल प्राप्त झाले होते. यापैकी ३०७ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ५२ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ४३ व रॅपिड टेस्टमधील आठ अहवालांचा समावेश आहे. रविवारी सुद्धा बुलडाणा शहरामध्ये पाच पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये बुलडाणा शहरातील मच्छी ले आऊटमध्ये एक पुरुष, जोहर नगर एक पुरुष, विष्णूवाडी एक महिला व एक पुरुष कोरोना बाधित आढळले आहेत. बुलडाणा तालुक्यातील चांडोळ येथेही एक कोरोना बाधित सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा फुगत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या