शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा रिपोर्ट यायला तब्बल सात दिवसांचा विलंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 12:48 IST

सात दिवसांचा कालावधी लागत असल्याने या सेंटरमध्ये भरती होणाऱ्या रुग्णांसह नातेवाइकांचा जीव टांगणीला लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या संशयित रुग्णांच्या स्वॅब नमुन्यांचे अहवाल येण्यास तब्बल सात दिवसांचा कालावधी लागत असल्याने या सेंटरमध्ये भरती होणाऱ्या रुग्णांसह नातेवाइकांचा जीव टांगणीला लागत आहे.कोरोना विषाणू महामारीच्या उपचारासाठी सुरुवातीचे दिवस महत्त्वाचे समजले जातात. त्याचवेळी तालुक्यातील काही संशयित रुग्णांच्या स्वॅब नमुन्याचे अहवाल सात दिवसांनंतरही प्राप्त होत नसल्याने त्यांच्यावर उपचारालाही विलंब होण्याचा प्रकार घडत आहे. नांदुरा शहरासह तालुक्यातील संशयित कोरोना रुग्णांचे स्वॅब आयटीआय येथील कोविड केअर सेंटरमध्ये घेतले जातात. त्यानंतर ते अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातात. त्यापूर्वी तीन ते चार दिवसांत अहवाल प्राप्त होत असत; मात्र आता या चाचणीचा अहवाल मिळण्यास सात दिवसांचा कालावधी लागत आहे.काही नंतर पाठवलेल्या स्वॅबचे अहवाल चौथ्या व पाचव्या दिवशी आले. तर काही सातवा दिवस असूनही प्रलंबित आहेत. या सर्व विलंबाने संशयित कोरोना रुग्ण व नातेवाइकांचा जीव टांगणीला लागत आहे. २३ सप्टेंबर रोजी शहरातील काही रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी व इतर अधिकाऱ्यांना विचारणा केली. त्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयासोबत संपर्क केला असून, काही अहवाल प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली. काही रुग्णांना लक्षणे दिसल्यास तत्काळ रॅपिड टेस्ट करून औषध उपचार केल्या जात असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे यांनी दिली. बुलडाणा येथे आरटीपीसीआर लॅब कार्यान्वित झाली असली तरी अद्याप तपासणी अहवाल मिळण्यास विलंब होत आहे.

पाठवलेल्या स्वॅब नमुन्यांचे रिपोर्ट तीन ते चार दिवसांनी मिळतात. प्रलंबित रिपोर्टबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयासोबत संपर्क केला आहे.-अभिलाश खंडारे, तालुका आरोग्य अधिकारी नांदुरा  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNanduraनांदूरा