शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव ठरतेय कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 12:04 IST

गत चार दिवसात ६० रूग्ण पॉझिटीव्ह आढळले असून, रूग्णसंख्येने शतक पार केले आहे.

- विवेक चांदूरकर लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जिल्ह्यात आतापर्यंत मलकापूर हॉटस्पॉट होते. मात्र आता मलकापूरपेक्षा खामगावमधील रूग्णसंख्या वाढत असून खामगाव तालुका हॉटस्पॉट झाला आहे. गत चार दिवसात ६० रूग्ण पॉझिटीव्ह आढळले असून, रूग्णसंख्येने शतक पार केले आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसात आणखी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या ४८२ झाली आहे. जिल्ह्यात आधी मलकापूरमध्ये रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे मलकापूर जिल्ह्यातील हॉटस्पॉट ठरले होते. आता मात्र खामगावात रूग्णांची संख्या वाढत आहे. खामगावात ३ एप्रिल रोजी सर्वात पहिला रूग्ण आढळला होता. त्यानंतर ७ एप्रिल रोजी दुसरा रूग्ण आढळला. त्यानंतर २१ मे रोजी ८ रूग्ण आढळले होते. त्यानंतर एक- दोन रूग्ण आढळत होते. १८ जून दरम्यान जिल्ह्यात एकही पॉझिटीव्ह रूग्ण नव्हता. मात्र गत चार दिवसांपासून रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. १० जुलै रोजी १३ रूग्ण पॉझिटीव्ह आढळले तर ११ जुलै रोजी पुन्हा १३ रूग्ण आढळले आहेत. १२ जुलै रोजी २० रूग्ण पॉझिटीव्ह आढळले असून, रूग्णसंख्या आता ११० झाली आहे. मलकापूरमध्ये ८ एप्रिल रोजी पहिला रूग्ण आढळला होता. आतापर्यंत मलकापूरमध्ये ८० रूग्ण आढळले आहेत. मलकापूरमध्ये ८ जून रोजी ९ तर १२ जून रोजी १० रूग्ण आढळले होते. शहरातील अनेक नागरिक अकोला ये- जा करीत असल्यामुळे अकोल्यातील रूग्णांच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. शहरातील बहूतांश भागात रूग्ण आढळत असल्याने कडक निर्बंध घालण्याची गरज आहे.

चार जणांचा मृत्यूतालुक्यातील चार जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सर्वात पहिला मृत्यू १८ मे रोजी समन्वय नगरातील एका ६५ वर्षीय महिलेचा झाला होता. १ जुलै रोजी सतीफैलातील एका ९० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला तर ६ जुलै रोजी फाटकपुरा परिसरातील ८८ वर्षीय सेवानिवृत्त प्राध्यापकांचा मृत्यू झाला. ११ जुलै रोजी ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.

खामगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात रॅपीड टेस्ट करण्यात येत आहे. रूग्णसंख्या सध्या वाढत असली तरी रॅपीड टेस्ट केल्यामुळे रूग्ण लवकर निदर्शनास येत आहे. परिणामी सदर रूग्ण दवाखान्यात भरती होत असून, प्रसार रोखण्यास मदत होत आहे. रॅपीड टेस्टमुळे सध्या रूग्ण वाढत असले तरी नंतर रूग्णसंख्या कमी होणार आहे.- मुकेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी, खामगाव

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkhamgaonखामगाव