शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उमेद अभियानातील महिला बनल्या कोरोना वॉरियर्स;  बनविले ५ हजार मास्क!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 15:40 IST

उमेद अभियानाअंतर्गत स्थापन झालेल्या १५ महिला बचत गटातील एकूण १२० महिला शिवण काम करीत आहेत.

- जयदेव वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती जळगावच्या वतीने कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी तालुक्यातील बचत गटाच्या महिलांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला पाटील , विस्तार अधिकारी संदीप मोरे यांनी त्यांच्या यंत्रणेमार्फत उपाय योजना केल्या. तालुका अभियान कक्ष व कार्यरत अधिकारी आर.सी.शेख यांच्या स्वयंसहायता समुहातील बचत गटाच्या महिलांनी याकरिता योगदान दिले. जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प संचालक यांच्या मार्गदर्शनात समूहातील महिलांकडून मास्क तयार करण्यात आले.गाव पातळीवर कोरोना रोखण्यासाठी मोठया प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असून, विविध गावात बचत गटाच्या महिलांनी मास्क तयार करून सामाजिक बांधिलकी जोपासली. 500 मास्क विनामूल्य ग्रामपंचायतींना दिले. गावातील लोकांनी मास्क वापरावा हा संदेश यातून देण्यात आला.या कामाकरिता तालुक्यातील एकूण १२० महिला शिवण काम करतात. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, नगरपरिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत कडून मास्क तयार करण्यासाठी आॅर्डर देण्यात आली. उमेद अभियानाअंतर्गत स्थापन झालेल्या १५ महिला बचत गटातील एकूण १२० महिला शिवण काम करीत आहेत. मास्कसाठी आवश्यक असणारा कापड तहसीलदारांच्या मार्गदर्शनात उपलब्ध करून देण्यात आला. मास्कची संख्या पाहता कापड कमी पडत असल्याने खामगाव येथून कापड उप्लधब करून देण्यासाठी शेख यांनी प्रयत्न केले.मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हास्तरावरू कोरोनाविरोधात लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना गाऊन तयार करून देण्याचे कामही बचत गटांच्या महिलांकडून करून घेण्यात येणार आहे.नगरपरिषद जळगाव, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ४७ ग्रामपंचायत, विविध मेडिकल स्टोअर्स यांच्या मागणीनुसार मास्कचा पुरवठा बचत गटाच्या महिलांकडून करण्यात येत आहे. महिला स्वयंसहायता समूहामार्फत मास्क निर्मितीचे काम सुरू असून सर्व विभागांना उर्वरित मास्कचा पुरवठा करण्यात येणार आहे. मास्क निर्मितीसाठी तालुका समन्वयक विनोद शेगोकार, प्रभाग समन्वयक राजगोविंद मडावी, दलाल, हर्षा बोडके जामोद, अनुराधा कोथळकर, मीना कापरे सुनगाव, शोभा हिवरकार धानोरा, शालिनी वानखडे, जयश्री वानखडे वडशिंगी, राधा खापट पिंपळगाव काळे, शीला गायकी पळशी सुपो यांच्यासह महिला प्रयत्न करीत आहेत. महिलांना मिळाला रोजगार!सध्या लॉकडाऊनच्या काळात एकीकडे मजुरांना मजुरी नाही तर दुसरीकडे मास्क तयार करण्याच्या या उपक्रमातून बचत गटाच्या महिलांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. यातून कोरोना विरोधात लढणाºयांना मास्क उपलब्ध होत असून दुसरीकडे महिलांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस