शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात १० केंद्रांमध्ये हाेणार काेराेना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 10:55 IST

Corona vaccine १० केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : काेराेना लसीकरणास देशभरात १६ जानेवारीपासून सुरुवात हाेणार आहे. त्यादृष्टीने आराेग्य विभागाने जिल्ह्यात लसीकरण माेहीम राबविण्याची तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात १० केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देशभरात काेराेना लसीकरण १६ जानेवारीपासून सुरू हाेणार असल्याची घाेषणा केंद्र सरकारने केली आहे.  त्यानुसार जिल्ह्यातही आराेग्य यंत्रणेने लसीकरणाची तयारी पूर्ण केली आहे. पहिल्यात  टप्प्यात  आरोग्य विभागातील १३,५०० फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना १० केंद्रांवर ही लस देण्यात येणार आहे.  प्रत्यक्ष लसीकरणाच्या मोहिमेत कुठलीही अडचण येऊ नये या दृष्टिकोनातून लसीकरणाची ८ जानेवारी रोजी रंगीत तालीम करण्यात आली हाेती. लसीकरणासाठी प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष अशी  त्रिस्तरीय रचना करण्यात येणार आहे. नोंदणीकृत लाभार्थीच्या मोबाइल क्रमांकावर लसीकरण तारीख, वेळ व ठिकाणचा मॅसेज पाठविण्यात येणार आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यातील दहा केंद्राची निवड करण्यात आली असून, तेथे तयारीही पूर्ण करण्यात आली आहे. आराेग्य विभागाची तयारी पूर्ण झाली असली तरी अद्याप लस काेणती देण्यात येणार, याविषयीची माहिती आराेग्य विभागाला मिळालेली नाही.  आतापर्यंत १३ हजार ५०० कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे नोंदणी झालेली आहे.  सोबतच लस साठवणुकीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.  आराेग्य प्रशासनाला काेराेना लसीची अद्याप प्रतीक्षा आहे.  १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू हाेण्याची शक्यता आहे. 

या केंद्रात हाेईल लसीकरण जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, मलकापूर, बुलडाणा, चिखली, देऊळगावराजा, मेहकर, साेनाळा, सुलतानपूर आणि नांदुरा येथे आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. त्याविषयीची तयारी आराेग्य विभागाच्या पूर्ण झाली आहे. 

आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे. त्यासाठी दहा केंद्रांची निवड करण्यात आली असून, तयारी पूर्ण करण्यात आली आहे. लस कुठली येणार तसेच कधी येणार याविषयी माहिती मिळालेली नाही.    - डाॅ. नितीन तडस,  जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाCorona vaccineकोरोनाची लस