कोरोना चाचण्या वाढवाव्या -  राजेंद्र शिंगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 10:56 AM2020-10-18T10:56:39+5:302020-10-18T10:56:55+5:30

कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात यावा, अशा सुचनाच पालकमंत्री यांनी  राजेंद्र शिंगणे १७ ऑक्टोबर रोजी आढावा बैठकीत दिल्या.

Corona tests should be increased - Rajendra Shingane | कोरोना चाचण्या वाढवाव्या -  राजेंद्र शिंगणे

कोरोना चाचण्या वाढवाव्या -  राजेंद्र शिंगणे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
बुलडाणा:  गेल्या काही काळापासून जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली असली तरी कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळेतर हे होत नाही ना? याची पडताळणी करण्यात येवून  दररोज प्रशासनाने किमान एक हजार चाचण्यांचा होणे अपेक्षीत आहे. त्यातच प्रयोगशाळाही पुर्ण क्षमते कार्यान्वीत झाल्याने कोरोना चाचण्यांची गतीही वाढविण्याची अवश्यकत आहे. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात यावा, अशा सुचनाच पालकमंत्री यांनी  राजेंद्र शिंगणे १७ ऑक्टोबर रोजी आढावा बैठकीत दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात कोविड संसर्ग प्रतिबंधाच्या संदर्भाने त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी उपरोक्त सुचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, अतिरिकक्त मुख्ख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. राजेश सांगळे, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते प्रामुख्याने उस्थित होते.
दरम्यान ग्रामस्तरावरील आरोग्य यंत्रणेला अधिक सक्रीय करून बाधीत रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवून त्यांच्याही चाचण्या करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिले. चाचण्यांचा वेग वाढविण्यात यावा तसेच उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व मोठ्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोवीड चाचण्यांची व्यवस्था करण्यात यावी. गावाजवळच कोवीड चाचणीची व्यवस्था केल्यास चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यास मदत मिळले. दरम्यान, मधल्या काळात चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे बाधीत रुग्ण सापडण्याचेही प्रमाण कमी झाले होते. आता दोन दिवसापासून त्यात वाढ झाली आहे.


 

Web Title: Corona tests should be increased - Rajendra Shingane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.