शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील एकमेव लॅबमध्ये ६७ हजार जणांची कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना चाचणीसाठी सप्टेंबर महिन्यापासून प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. या प्रयोगशाळेत दिवसाला साधारण २०० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना चाचणीसाठी सप्टेंबर महिन्यापासून प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. या प्रयोगशाळेत दिवसाला साधारण २०० जणांची मिळून आजवर ६७ हजार जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी आठ हजारांपेक्षा अधिक लोकांना कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले आहे.

देशात कोरोना संसर्गाचा शिरकाव झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. यासाठी शासनाने लॉकडाऊन आणि जिल्हा सीमाबंदीसह विविध उपाय योजना लागू केल्या. आरोग्य विभागाकडूनही कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जनतेत जनजागृती सुरू करण्यात आली.

बुलडाणा जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आला. सुरुवातीला बुलडाणा जिल्ह्यात कोरोना चाचणीची सुविधाच नसल्याने संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी अकोला, अमरावती आणि नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले जात होते. त्यामुळे रुग्णाचा चाचणी अहवाल प्राप्त होण्यास विलंब लागत होता. परिणामी, कोरोनाबाधितांच्या संपर्कातील रुग्णांची चाचणी करणेही अशक्य हाेत होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून जिल्ह्यातच कोरोना चाचणीसाठी आरटीपीसीआर प्रयोगशाळा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

पालकमंत्र्यांनी बुलडाणा जिल्ह्यात प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. यासाठी लागणाऱ्या तज्ज्ञ मंडळीची पदस्थापना आणि इतर सुविधा उपलब्ध करण्यास निधीही उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे बुलडाणा येथे जिल्हास्तरावर स्त्री रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी आरटीपीसीआर प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. या प्रयोगशाळेत १६ फेब्रुवारीपर्यंत एकूण ६७ हजार लोकांची कोरोना चाचणी करणे आरोग्य विभागाला शक्य झाले. यामुळे वेळेत चाचणी होऊन कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविणेही शक्य झाले आहे.

सर्वच रिपोर्ट अचूक

जिल्ह्यात आरटीपीसीआर लॅबमध्ये दरदिवशी सरासरी २०० जणांची कोरोना चाचणी केली जात आहे. यात प्रामुख्याने बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींसह इतर संशयितांचा समावेश आहे. त्यात एकाही चाचणीत दोष आढळून आला नाही किंवा चुकीची असल्याचा प्रकार घडला नाही.

लॅबचा कायम वापर

कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असून, पुढे जिल्हा कोरोनामुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, कोरोना चाचणीसाठी सुरू केलेली प्रयोगशाळा पुढे कोणत्याही प्राण्यांपासून किंवा डासांपासून होणाऱ्या आजारांसह विविध आजारांच्या निदानासाठी उपयोगात आणली जाणार आहे.

एनआरएचएम कडून मिळाला दीड काेटींचा निधी

जिल्ह्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळेसाठी एनआरएचमधून दीड काेटी रुपयांचा निधी देण्यात आला. तसेच सर्वसाधारण योजनेतूनही निधी देण्यात आला. प्रयाेगशाळेतील साहित्य खरेदीसाठी लाेकप्रतिनिधींनी आपला निधी दिला हाेता.

जिल्ह्यातील कोरोना चाचणीसाठी बुलडाणा येथे सुरू करण्यात आलेल्या आरटीपीसीआर लॅबमध्ये विविध तज्ज्ञ मिळून जवळपास २४ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा स्टाफ कार्यरत आहे.