शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंडमधून आलेल्या सात जणांची कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 13:25 IST

Corona test of seven return from England बुलडाणा जिल्ह्यात आलेल्या सात जणांचे ट्रेसिंग जिल्हा प्रशासनाने केले

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : इंग्लंडमधील कोरोना विषाणूमध्ये झालेल्या जनुकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर तेथून बुलडाणा जिल्ह्यात आलेल्या सात जणांचे ट्रेसिंग जिल्हा प्रशासनाने केले असून, त्यांच्या कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, सिंदखेडराजा तालुक्यातील एकाचे स्वॅब नमुने हे  २५ डिसेंबर रोजी रात्री बुलडाणा येथे तपासणीसाठी आणण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या चार दिवसांपूर्वी आनुषंगिक विषयान्वये अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यासंदर्भाने २५ डिसेंबर रोजी राज्य शासनाने जिल्हा प्रशासनास २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत इंग्लंडमधून जिल्ह्यात दाखल झालेल्या अशा नागरिकांचे ट्रेसिंग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने लगोलग पावले उचलली आहेत. या नागरिकांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्याही चाचण्या करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. सोबतच उपजिल्हाधिकारी दर्जाच्या एका अधिकाऱ्याचीही या कामाचा लेखाजोखा ठेवण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सात प्रवासी जिल्ह्यात २४ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरदरम्यान इंग्लंडमधून आलेल्या  सात जणांची नावे २४ डिसेंबर रोजी झालेल्या व्हीसीमध्येच जिल्हा प्रशासनास पुरविण्यात आली होती. त्या अनुषंगाने शेगाव येथील एक, खामगाव येथील दोन, मलकापूर येथील तीन आणि सिंदखेडराजा तालुक्यातील एकाची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये शेगाव, खामगाव आणि मलकापूर येथील सहा जणांचे चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातील एकाच्या चाचणीचा अहवाल २६ डिसेंबरला मिळेल.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या