शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना चाचणी अहवाल आठवडाभर ‘वेटिंगवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 11:35 IST

Khamgaon News : परिणामी रुग्णांवर उपचार तरी कोणते करावे, असा प्रश्न डॉक्टरांपुढे उपस्थित झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : तालुक्यासह जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाचा प्रचंड उद्रेक होत असताना तपासणीचे अहवाल उशिरा प्राप्त होत असल्याने रुग्ण सैरभैर झाले आहेत. परिणामी रुग्णांवर उपचार तरी कोणते करावे, असा प्रश्न डॉक्टरांपुढे उपस्थित झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे खासगी आरोग्य यंत्रणा पार कोलमडून गेली आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.सुरुवातीला रुग्णसंख्या कमी असल्याने रुग्णांचे अहवाल एक ते दोन दिवसांत प्राप्त व्हायचे. संबंधित रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्यास त्याच्यावर तातडीने कोरोनाचे औषधोपचार सुरू केले जायचे. मात्र गेल्या काही दिवसांत वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे. शासकीय आरोग्य यंत्रणेने पाठविलेल्या रुग्णांच्या स्वॅबचे अहवालदेखील चार ते पाच दिवस मिळत नाहीत. त्यामुळे संबंधित रुग्ण एकतर गृहविलगीकरणात राहतो किंवा इतरत्र फिरत असतो. यातून संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.खामगाव शहरातील काही खासगी लॅबकडूनही संशयित रुग्णांचे स्वॅब घेतले जातात. त्यानंतर ते नागपूर, अकोला, बुलडाणा, अमरावतीला पाठविले जातात. मात्र त्याचा अहवाल येण्यासाठी आठवडाभराचा विलंब होत आहे. यासंदर्भात अकोला, नागपूर येथील चाचणी केंद्राशी संपर्क साधून विचारणा केली असता, अकोला, नागपूर शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने तपासणी केंद्रांवर मोठा ताण आला आहे. त्यामुळे बाहेरून येणारे स्वॅब स्वीकारणे सध्या बंदच केले असल्याचे या तपासणी केंद्रचालकाने सांगितले. त्यामुळे संशयीत सैरभैर झाले आहेत.

अहवालाची प्रतीक्षा कायमसंबंधित संशयित रुग्णांचे नातेवाईक दररोज तपासणी अहवाल आला काय, याची चाचपणी करीत आहेत. मात्र अहवालच मिळत नसल्याचे काही रुग्णांच्या नातलगांनी सांगितले. एकीकडे चाचणीच्या अहवालाला विलंब होत असताना दुसरीकडे कोरोनाच्या उपचारासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक औषधांचा साठादेखील संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याने येत्या काही दिवसांत मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :khamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या