शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ५१२९ शिक्षकांची होणार कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 12:19 IST

Corona Test of Teacher जिल्ह्यातील ५ हजार १२९ शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. 

  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून सर्व नियोजन सुरू झाले आहे; परंतु कोरोना अद्यापही कायम असल्याने मुलांना शाळेत पाठविण्याची भीती पालकांमध्ये आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील ५ हजार १२९ शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाकडून निर्णय देण्यात आलेला नव्हता. त्यामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरू होते. दरम्यान, दिवाळीनंतर इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होते. त्यातही मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबत पालकांची संमती बंधनकारक करण्यात आली होती. त्याच धर्तीवर आता इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्यात येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होणार असल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांचा आढावा घेऊन तयारी  सुरू केली आहे. शाळांच्या स्वच्छतेविषयी मार्गदर्शक सूचना सर्व मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. शाळांचे निर्जंतुकीकरण करणे, मास्क वापरणे, स्वच्छतागृहाची साफसफाई, पिण्याचे पाणी, सुरक्षित अंतर, सॅनिटायझर, आदी विषयांबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  खबरदारी शाळा सुरू होणार असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. शिक्षकांची कोरोना तपासणी करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. -सचिन जगताप, प्रभारी शिक्षणाधिकारी, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याTeacherशिक्षक