तपासणी करण्यात आलेल्या १,७६० अहवालांपैकी १,१७७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा ७८, सुंदरखेड चार, भादोला ११, दत्तपूर दोन, बिरसिंगपूर एक, घटनांद्रा एक, खेर्डी एक, येळगाव एक, खामगांव ३५, पिंपरी गवळी एक, पिंप्राळा दोन, कादमापूर एक, सुटाळा एक, शहापूर दोन, गणेशपूर चार, नागापूर एक, टेंभुर्णा २१, लखानवाडा एक, निमगाव पाच, वडनेर एक, आमसरी एक, धानोरा एक, मोमिनाबाद एक, खडत गाव एक, शेलगाव मुकुंद दोन, फुली दोन, मलकापूर ८४, निमखेड एक, लोणवडी एक, जांभूळ धाबा एक, दाताळा एक, चिखली ३७, खंडाळा एक, वरुड दोन, मेरा खु. एक, केळवद एक, मलगी एक, शेलूद एक, सवणा एक, दिवठणा एक, भोकरवाडी दोन, कटोडा एक, हातनी एक, माळशेंबा एक, पळसखेड जयंती एक, सिं.राजा १०, साखरखेर्डा ८, पिंपरखेड ९, दुसरबीड चार, हिवारखेड पूर्णा सात, आडगाव राजा एक, राहेरी खु. एक, कोथळी १२, धा. बढे दोन, आडविहीर एक, पोफळी एक, राजूर एक, बोराखेडी एक, पि. गवळी दोन, किन्होळा सात, गीरोली एक, रामगाव एक, कुऱ्हा एक, मोताळा तीन, शेगांव ६५, चिंचोली दोन, गौलखेड एक, खेर्डा दोन, हिंगणा तीन, चिंचखेड एक, सोनाळा एक, वरवट बकाल दोन, शेवगा एक, पातुर्डा दोन, जळगाव जामोद १८, कुरणगड बु. एक, पिंपळगाव काळे दोन, धानोरा दोन, दे. राजा २१, आळंद एक, पिंपळगाव चि. एक, हिवरखेड चार, अंभोरा एक, अंढेरा एक, चिंचोली बुरुकुल सहा, मेहुणा राजा दोन, लोणार पाच, सरस्वती एक, हिरडव दोन, मेहकर एक, हिवरा आश्रम तीन, नांदुरा १२ आणि जालना येथील एकाचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, ५६१ जणांनी शुक्रवारी कोरोनावर मात केली. आतार्पंत २० हजार ४३२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील २,२८६ संदिग्धांच्या अहवालाची सध्या प्रतीक्षा असून, एकूण बाधितांची संख्या आता २० हजार ४२३ झाली आहे. त्यापैकी ३,४६९ सक्रीय रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
--खामगावातील तिघांचा मृत्यू--
शुक्रवारी जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी तीन जण हे खामगाव शहरातील आहेत. त्यात नीळकंठनगरमधील ८३ वर्षीय व्यक्ती पटवारी कॉलनीतील ६५ वर्षीय व्यक्ती आणि नाथ प्लॉट भागातील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. यासोबतच मोताळा तालुक्यातील माकोडी येथील ७६ वर्षीय महिला आणि राजूर येथील ७३ वर्षीय व्यक्ती, चिखली तालुक्यातील धोत्रा नाईक येथील ७५ वर्षीय व्यक्ती आणि नांदुरा शहरातील वार्ड क्रमांक ११ मधील ७४ वर्षीय व्यक्तीचा यात समावेश आहे.