शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे बुलडाण्यात आणखी एकाचा मृत्यू, १७ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 12:21 IST

Buldhana CoronaVirus update बुलडाणा येथील एका ७२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात शुक्रवारी प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या ४५९ अहवालांपैकी ४४२ अहवाल निगेटिव्ह आले असून, १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दुसरीकडे उपचारादरम्यान बुलडाणा येथील एका ७२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील एकूण मृतकांची संख्याही आता १४२ झाली आहे तर एकूण कोरोना बाधितांची संख्या ११,७३५ झाली आहे. त्यापैकी २८८ सक्रिय रुग्ण आहेत.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा सात, जांब एक, नांदुरा तीन, भोकरवाडी एक, पाटोदा एक, मलगी एक, तांदूळवाडी दोन, लोणार शहरातील एकाचा समावेश आहे. कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ३३ असून, यामध्ये चिखली कोविड केअर सेंटरमधून तीन, जळगाव जामोदमधून आठ, सिंदखेड राजा तीन, देऊळगाव राजा १४, बुलडाणा १३ आणि खामगावमधील तीन जणांचा समावेश आहे. बुलडाणा शहरातील तानाजी नगरमधील एका ७२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे रुग्णालयात शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या अहवालांपैकी ८० हजार ७३९ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधितांपैकी ११ हजार ३०५ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. शुक्रवारी १,४५७ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे तर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार ७३५ झाली आहे. प्रत्यक्षात रुग्णालयात २८८ सक्रिय रुग्ण आहे. आतापर्यंत १४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या