पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यातील ६३, खामगाव तालुक्यातील ५६, शेगाव तालुक्यातील २६, देऊळगावराजामधील ७०, चिखली ११९, मेहकर ५९, मलकापूर २८, नांदुरा २१८, लोणार ६५, मोताळा १६, जळगाव जामोद १५, सिंदखेडराजा ३० आणि संग्रामपूर तालुक्यातील ८ जणांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यातील पारस येथील २८ वर्षीय व्यक्ती, सिंदखेडराजा तालुक्यातील सायाळा येथील ६५ वर्षीय पुरुष, बुलडाणा तालुक्यातील मासरूळ येथील ५५ वर्षीय पुरुष, बुलडाण्यातील जिजामाता नगरमधील ७२ वर्षीय महिला आणि नांदुरा तालुक्यातील सोनज येथील ७० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. रविवारी एकूण ५ जणांचा कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे ९७३ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या ३ लाख ८७ हजार २०३ संदिग्धांचे अहवाल तपासणीमध्ये निगेटिव्ह आले आहेत तर ६६ हजार २१४ बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
--३,६८० अहवालांची प्रतीक्षा--
रविवारी ३,६८० संदिग्धांचे अहवाल तपासणीसाठी घेण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ७१ हजार ६७७ झाली आहे. सध्या रुग्णालयामध्ये यापैकी ४,९८९ सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. ४७४ कोरोना बाधितांचा जिल्ह्यात आजपर्यंत मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.