शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’ संसर्गामुळे ओशाळली माणुसकी; अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक, गावकऱ्यांनी  फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 11:03 IST

तहसील प्रशासनाकडून तातडीने यंत्रणा हलविण्यात आल्यानंतर अखेर युवकाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देयुवकाच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक आणि गावकऱ्यांनी पाठ फिरविली. मृतदेह गावात पोहोचल्यानंतरही तब्बल चार तास पडून होता. महसूल प्रशासनाने मृत्यूमुखी पडलेल्या युवकावर अंत्यसंस्कार केले.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: एका दुर्धर आजाराने मृत्यूमुखी पडलेल्या एका युवकाच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक आणि गावकऱ्यांनी पाठ फिरविली. त्यामुळे मृतदेह गावात पोहोचल्यानंतरही तब्बल चार तास पडून होता. अखेर एका रूग्णवाहिका चालकाच्या सतर्कतेमुळे महसूल प्रशासनाने मृत्यूमुखी पडलेल्या युवकावर अंत्यसंस्कार केले.खामगाव तालुक्यातील रोहणा येथील अंकुश देशमुख नामक युवकावर गत काही दिवसांपासून बुलडाणा येथील सामान्य रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, त्याचा रूग्णालयात मृत्यू झाला. कोरोना संचारबंदीत त्याचा मृतदेह गावी कसा न्यावा, असा पेच त्याच्या कुटुंबियांना पडला असतानाच, बुलडाणा येथील एका संवेदनशील रूग्णवाहिका चालकाने त्याचा मृतदेह गावात आणला. मात्र, नातेवाईक आणि गावकऱ्यांनी त्याचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. त्यावेळी गावातील एक मुस्लिम वृध्द इसम या रूग्णवाहिका चालकाच्या मदतीला धावला. दोघांनी मिळून अंकुशचा मृतदेह एका ठिकाणी ठेवला. त्यानंतर तब्बल चार तासापर्यंत हा मृतदेह गावातील एका ठिकाणी पडून होता. दरम्यान, रूग्णवाहिका चालकाने जिल्हाधिकाºयांना भ्रमण दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसील प्रशासनाला माहिती देण्यात आली. तहसील प्रशासनाकडून तातडीने यंत्रणा हलविण्यात आल्यानंतर अखेर युवकाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले.गावकरी पळाले दूर!जगभर कोरोना विषाणू संक्रमणाने हाहाकार माजविला आहे. भीतीच्या वातावरणामुळे रोहणा येथील नागरिकांसह मृतक अंकुशच्या नातेवाईकांनीही त्याच्या मृतदेहास स्वीकारण्यास नकार दिला. रूग्णवाहिका गावात येताच, गावातील नागरिकांनी दूर पळ काढला.

वृध्दमातेसह चिल्यापिल्यांचा टाहो!गावातील नागरिकांची माणुसकी ओशाळल्यानंतर मृतदेहावर अंतिम संस्कारासाठी मृतकाची वृध्द माता, पत्नी आणि दोन मुलांनी एकच टाहो ठोकला. मात्र, कुणीही मदतीला धावले नाही. रूग्णवाहिका चालक, एक मुस्लिम वृध्द इसम, ग्रामसेवक तसेच महसूल प्रशासनातील कर्मचाºयांनी अंत्यसंस्कार पार पाडले.बुलडाणा येथील सामान्य रूग्णालयात मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचा मृतदेह स्व:खर्चाने गावी पोहोचविला. कुणीही न आल्याने शेवटी जिल्हाधिकाºयांना दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर तालुका प्रशासनाच्या सहकार्याने युवकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. युवकाचा मृतदेह स्मशानभूमीपर्यंत पोहोचून दिला. त्यावेळी गावातील एका मुस्लिम समाजाच्या वृध्दानेच केवळ मदत केली.- पप्पू दैवतरूग्णवाहिका चालक, बुलडाणा.

 

टॅग्स :khamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या