शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना: बुलडाणा पालिकेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 10:55 IST

कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी बुलडाणा नगर परिषदेच्यावतीने शहरात विविध उपाययोजना करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शहरातील कोरोना लागण झालेल्या व्यक्तीची माहिती देण्यासाठी, कोरोना संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी बुलडाणा नगर परिषद कार्यालयात कोरोना आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा संपर्क क्रमांक ९६२३८१७७६० आहे.शहरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी बुलडाणा नगर परिषदेच्यावतीने शहरात विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्याअतंर्गत शहरात स्वच्छतेची मोहिम राबविण्यात येत असून सार्वजनिक ठिकाणी कुणीही कचरा, घाण न करणे तसेच रस्त्यावर कुणीही थुंकू नये याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.शहरातील अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या किराणा दुकान तसेच मेडीकल स्टोअर येथे नागरिकांची गर्दी होत असल्याने ग्राहकामध्ये सुरक्षीत अंतर ठेवण्यासाठी नगर परिषदेकडून अत्यावश्यक सेवा देणाºया दुकानासमोर पेंटने किमान एक मीटर अंतरावर चौकोन, वर्तुळ आखण्यात आलेली आहे. नागरिकांनी एकमेकातील सुरक्षीत अंतर ठेवूनच दुकानावर आवश्यक ती खरेदी करावी. जेणेकरून कोरोना विषाणू संसर्ग रोखता येईल, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. बाहेर गावावरून येणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहनशहरात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर परिषदेच्यावतीने करण्यात येणाºया उपाय योजनास शहरातील नागरिकांनी नगर परिषदेस सहकार्य करावे. शहरात परदेशातून, मुंबई, पुणे आदी बाहेर गावावरून येणाºया नागरिकांची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षास द्यावी, असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस