शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संसर्गाचा ‘टी-१ सी-१’ वाघालाही बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 11:52 IST

वयात आलेल्या या वाघासाठी सुरू असलेल्या वाघिणीचा शोधही त्यामुळे लांबला आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्गाने सध्या संपूर्ण देशाला लॉकडाऊन केलेले असतानाच बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यातील टी-१ सी-१ वाघालाही कोरोनो संसर्गाचा फटका बसला असून वयात आलेल्या या वाघासाठी सुरू असलेल्या वाघिणीचा शोधही त्यामुळे लांबला आहे. सोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले देहरादून येथील वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ बिलाल हबीब यांचाही येथील दौरा त्यामुळे लांबला.आतापर्यंत जवळपास तीन हजार किमी पेक्षा अधिक किमीचा प्रवास केलेल्या टीपेश्वरमधील टी-१ सी-१ या वाघाने आता ज्ञानगंगा अभयारण्य त्याचा अधिवास म्हणून निवडले आहे. त्याची रेडीओ कॉलर आयडीही आता काढण्यात आली आहे. आता पूर्ण वाढ झालेला टी-१ सी-१ या वाघाला जोडीदार शोधण्यासोबतच ज्ञानगंगा अभयारण्य त्याच्या अधिवासासाठी उपयुक्त असल्याचा अभ्यास करण्यासाठी पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती.या समितीची सहा मार्च रोजी एक बैठक झाली होती. त्यात प्रत्यक्ष ज्ञानगंगा अभयारण्याची पाहणी व अधिवास क्षेत्र तपासण्यासाठी बिलाल हबीब व अन्य सदस्य २८ मार्च रोजी येणार होते. मात्र कोरोना संसर्गाच्या देशव्यापी संकटामुळे या समितीमधील सदस्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. परिणाी टी-१ सी-१ साठी जोडिदाराचा शोध घेण्याची प्रक्रियाही बाधीत झाली आहे.

३०१७ किमीचा प्रवास टी-१ सी-१ वाघाने जवळपास गेल्या १४ महिन्यात तीन हजार १७ किमीचा प्रवास केला आहे. दरम्यान त्याच्या रेडीओ कॉलर आयडीची बॅटरी संपत आली होती. त्यातच ज्ञानगंगा अभयारण्य त्याने निवडले असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. त्या पार्श्वभूमीवर त्याची कॉलर आयडी रिमोटद्वारे काढण्यात आली आहे.

कोरोना संसर्गाच्या संकटामुळे देहरादून येथील वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ बिलाल हबीब यांच्यासह पाच सदस्यीय समितीचा ज्ञानगंगा अभयारण्याची पाहणी करून त्याच्या अधिवासासाठी उपाययोजना करण्यासाबेतच जोडीदाराचा शोध घेण्याची प्रक्रिया बाधीत झाली आहे. येत्या काळात यासंदर्भात बैठक होऊन बिलाल हबीब हे ज्ञानगंगा अभयारण्यास भेट देणार आहे. येथील एकंदरीत अधिवासाचीही ते पाहणी करणार आहेत.- मनोजकुमार खैरनार,उपवन संरक्षक, वन्यजीव विभाग अकोला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाdnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्य