दरम्यान, शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या अहवालात बुलडाणा तीन, जळगाव जामोद एक, देऊळगाव राजा ११, चिखली सात, अंचरवाडी एक, केळवद सहा, अमोना एक, बागाव एक, पळसखेड जयंती एक, बेराळा तीन, देऊळगाव घुबे एक, चांधई एक, अमडापूर एक, करवंड एक, तोरणवाडा एक, मोहदरी एक, वैरागड एक, खामगाव नऊ, तरोडा एक, मोताळा एक, पळशी झाशी एक, साखरखेर्डा एक, सिंदखेडराजा तीन, बोरखेडी एक, आळंद एक, वरूड दोन, उकली एक, डोणगाव एक, मेहकर चार, वडशिंगी एक, डोमरूळ एक, मासरूळ एक, उमाळी एक, वाकोडी एक, आळंद एक, शिराढोण एक, नांदुरा येथील एकाचा समावेश आहे. दरम्यान, शनिवारी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दुसरीकडे, १८ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये बुलडाणा कोविड केअर सेंटरमधून चार, देऊळगाव राजा एक, शेगाव ११, मेहकर एक, चिखली येथील एकाचा समावेश आहे.
आतापर्यंत तपासणी केलेल्या अहवालांपैकी एक लाख आठ हजार ११२ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर आतापर्यंत १३ हजार ४०५ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. अद्याप १८०१ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३ हजार ९२८ झाली असून त्यापैकी सध्या ३५४ सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात १६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिाकरी दिनेश गिते यांनी दिली.